Breaking News

Home Breaking News Page 7

२० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पिंपरी | प्रतिनिधी :पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनोद अनंता धुमाळ यांनी त्यांच्या कुटुंबाची तब्बल २० वर्षांपासून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोडी पोलिसांकडे केली आहे. विकास करार करूनही ना विकासकाम झाले, ना करारानुसार मोबदला मिळाला, असा आरोप धुमाळ यांनी केला. धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर...

स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

0

पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, 'प्रती सरकार'चे शिल्पकार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.  यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत...

वाकड फाटा येथील दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलला भीषण आग; धुरामुळे १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड : वाकड फाटा परिसरातील दत्त मंदिर रस्त्यावर असलेल्या दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागून १९ वर्षीय युवकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस...

पिंपरी-चिंचवडकरांच्या नागरी समस्यांवर प्रशासनाला महिनाभराची डेडलाईन; प्रत्यक्ष कामाला प्राधान्य

0

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रलंबित नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करत प्रशासनाला महिनाभराची स्पष्ट डेडलाईन देण्यात आली. बैठकीस क-प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, ई-प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, फ-प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, ल-प्रभाग...

उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!

0

पिंपरी(प्रतिनिधी) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि 'नारी द वुमन' संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन उपमहापौर शर्मीलाताई बाबर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२३ जुलै) सायंकाळी सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तृतीयपंथीय समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक स्वीकार यावर भर देत...

पिंपरी मतदारसंघातील वीज समस्या १ महिन्याच्या आत सोडवा, आमदार अमित गोरखे यांचा महावितरणला अल्टीमेटम

0

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वाढती वीज समस्या आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यावर तात्काळ ठोस उपाययोजना काढण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे २८ जुलै रोजी उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांच्या समस्या मांडत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सक्त निर्देश दिले. वारंवार...

घरगुती हिंसाचाराच्या तपासाचे ‘सहलीत’ रूपांतर; विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई

0

पुणे : घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणाच्या अधिकृत तपासासाठी सातारा येथे गेलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी पर्यटन केल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला आहे. या गंभीर निष्कर्षानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी संचयी परिणामाशिवाय रोखण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवडे, पोलीस शिपाई श्रीहरी पाटील आणि कोमल कांबळे यांचा समावेश...

बनावट पदवीप्रकरणी एसपीपीयूमध्ये मोठा घोटाळा? उच्चस्तरीय चौकशीची रोहित पवार यांची मागणी

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) उघडकीस आलेल्या कथित बनावट पदवी व गुणपत्रिका प्रकरणाची व्याप्ती आतापर्यंत समोर आलेल्या माहितीपेक्षा अधिक मोठी असू शकते, असा गंभीर दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी जोरदार मागणी केली. विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याने...

पुणे–पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती! ई-आरटीएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0

पिंपरी, दि. २८ जुलै २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’ आणि महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन….

0

पिंपरी, दि. २८ जुलै :- "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ यंदापासून सात दिवस विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. प्रथमच आयोजित करण्यात येणारी 'साहित्यरत्न दौड' ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी आणि सामाजिक एकतेचा...

Copyright ©