पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वाढती वीज समस्या आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यावर तात्काळ ठोस उपाययोजना काढण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे २८ जुलै रोजी उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांच्या समस्या मांडत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सक्त निर्देश दिले.







