0
0
0
0
0

मुंबई

Home मुंबई

मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सॅटेलाईट फोनचे वितरण

0

मुंबई | प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामानातील बदल आणि सुरक्षा सूचना वेळेत प्राप्त व्हाव्यात तसेच मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम समुद्री भागातही संपर्क कायम राहावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. समुद्रातील मच्छिमारांची...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली SDGs इंडिया इंडेक्सचा आढावा

0

मुंबई | प्रतिनिधी : राज्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals - SDGs) इंडिया इंडेक्समधील महाराष्ट्राच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेणारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रगती, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता, तसेच भविष्यातील कृती...

ठाण्यात मोठा अनर्थ टळला! घोडबंदर उड्डाणपुलावर १२ टन गुळाने भरलेला ट्रक कठडा तोडून कडेला लटकला; वाहतूक ठप्प

0

ठाणे : ठाण्यातील गजबजलेल्या घोडबंदर मार्गावर शुक्रवारी पहाटे अत्यंत थरारक आणि धक्कादायक अपघात घडला. १२ टन वजनाचा गूळ वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालकावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि उड्डाणपुलाच्या कडेला धोकादायकरीत्या लटकून राहिला. काही क्षणांसाठी घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वाहनचालकांचा श्वास रोखला गेला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही आणि मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास...

आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लिखित उत्तर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केली महत्त्वपूर्ण घोषणा

0

मुंबई, दिनांक 25 जून 2026: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री मा. नामदार योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत...

मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून खून! प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसून हत्या; आरोपी रोशन सुवर्णा ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबईच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून आरोपी रोशन रमेश सुवर्णा याला बोरीवली न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची...

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले; अंधेरी सबवे जलमय, वाहतुकीचा खोळंबा

0

मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंधेरी सबवे परिसर पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे परिसरात...

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर पूर्वतयारीचा आढावा

0

मुंबई  : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. लाखो वारकरी, भाविक आणि संत परंपरेचे अनुयायी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना त्यांच्या सुरक्षितता, सुविधा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार...

अंधेरी पश्चिममध्ये महापालिकेची धडक कारवाई; फन रिपब्लिक मार्ग आणि वीरा देसाई मार्गावरील अनधिकृत स्टॉल व शेड हटवले

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत अंधेरी पश्चिम येथील के-पश्चिम विभागात मोठी धडक कारवाई केली. प्रभाग क्रमांक ६३ अंतर्गत फन रिपब्लिक मार्ग आणि वीरा देसाई मार्ग परिसरातील अनधिकृत स्टॉल, शेड आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास तसेच पादचाऱ्यांना मोकळा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार...

ठाण्यात ‘सूर्य’ कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन; शिवसेनेच्या जनसंपर्क आणि लोकसेवेला नवे बळ, ‘लाडकी सून अभियान’ कार्यालयाचाही शुभारंभ

0

ठाणे : ठाणे शहरातील शिवसेनेच्या जनसंपर्क आणि लोकसेवेच्या कार्याला अधिक गती देणाऱ्या ‘सूर्य’ या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्यांसह नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि समाजहिताची विविध कामे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी...

ठाण्यात शाळा प्रवेशोत्सवाचा उत्साह; विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश, महापालिका शाळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ठाणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत ठाण्यातील किसन नगर येथील महापालिका शाळा क्रमांक २३ मध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे शाळेचा परिसर आनंद,...

Copyright ©