‘काही जणांच्या कृत्यामुळे निष्पाप नागरिकांना त्रास होऊ नये’; गणेशोत्सवातील ध्वनी व वायुप्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाची गंभीर चिंता
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Motu) जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला के. गोखले यांच्या खंडपीठाने मोठ्या आवाजातील संगीत, परवानगीच्या वेळेचे उल्लंघन आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट केले की गणेशोत्सव आणि मिरवणुका आयोजित करण्यास आक्षेप नाही; मात्र उत्सव साजरा...
रुग्णांच्या हक्कांसाठी ९० दिवसांचा अल्टिमेटम; हॉस्पिटल बिलिंगमध्ये पारदर्शकता आणण्याची पेशंट्स राइट्स कौन्सिलची मागणी
पुणे : रुग्णालयांमधील उपचारांचा वाढता खर्च, अस्पष्ट बिलिंग, औषधे व वैद्यकीय साहित्याच्या किमतीतील मोठी तफावत आणि रुग्णांना मिळणाऱ्या माहितीच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर पेशंट्स राइट्स कौन्सिलने आरोग्य क्षेत्रात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संस्थापक-अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्या मांडल्या असून, सरकारने या मागण्यांवर ९० दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा...
नवले पुलाजवळील भूमकर पुलावर पुन्हा भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील नऱ्हे परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपासवरील या पुलावर एका मालवाहू कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यानंतर कंटेनरने पुढील वाहनांना धडक दिली. उपलब्ध पोलिस माहितीनुसार या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. ब्रेक...
‘गन मॅन’ शैलेश जगताप यांना न्यायालयाकडून दिलासा; खंडणी प्रकरणातील कार्यवाही उच्च न्यायालयाने केली रद्द
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील तत्कालीन पोलीस हवालदार शैलेश हरिभाऊ जगताप यांच्याशी संबंधित खंडणी आणि कथित बेकायदेशीर नजरकैद प्रकरणात महत्त्वपूर्ण न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी शैलेश जगताप यांच्या याचिकेला मंजुरी देत पुण्यातील कनिष्ठ न्यायालयासमोरील संबंधित कार्यवाही रद्द आणि बाजूला केली. हा आदेश न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने दिला. या प्रकरणात तक्रारदार राहुल...
IISER पुणे विद्यार्थी आंदोलनावर संस्थेची भूमिका; बहुतांश मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न, मात्र विद्यार्थी संघटनेच्या महासचिवावरील निलंबन कायम
पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या बहुतांश मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि प्रक्रिया उभारण्याचे काम सुरू असल्याचे संस्थेने म्हटले आहे. मात्र, विद्यार्थी संघटनेच्या महासचिवावरील निलंबनाचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याचे संस्थेच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करताना...
हिंजवडी मेट्रोला मोठी कनेक्टिव्हिटी! ५ आयटी कॅम्पसना थेट फुटओव्हरब्रिज; तब्बल ९० हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा
पुणे : पुणे शहर आणि हिंजवडी आयटी पार्कमधील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील पाच मोठ्या कंपन्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या कार्यालयीन कॅम्पसना जवळच्या मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी समर्पित फुटओव्हरब्रिज (FOB) उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हिंजवडी मेट्रो मार्गिकेचा...
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम; महावितरणकडून फिडर मेंटेनन्स, नवीन GOD, फिडर पिलर आणि LT केबलची कामे पूर्ण
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी आमदार अमितजी गोरखे यांच्या पुढाकारातून महावितरण प्रशासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांना गती दिली आहे. निगडी-प्राधिकरणासह आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर तसेच संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. वारंवार होणारे फिडर बिघाड, जुन्या केबल, DTC यार्डमधील...
वाकडच्या काळाखडक परिसरात स्कूल बसला अचानक आग; विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका, मोठी दुर्घटना टळली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी सुमारे १०.३३ वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत होती. बस काळाखडक परिसराच्या दिशेने जात असताना चालकाच्या निदर्शनास...
शहर अभियंतापदी नियुक्तीबद्दल मनोज सेठिया यांचा महापालिका सभेत सत्कार
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज झालेल्या महापालिका सभेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आजवरच्या प्रशासकीय व अभियांत्रिकी सेवेचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर असून वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, विकासकामांची गुणवत्ता कायम...
पुण्यात FDAचा धडाका! ‘हॉटेल चुल मटण’चा परवाना निलंबित; ४ दिवसांत १० लाखांहून अधिक किमतीचे प्रतिबंधित पदार्थ जप्त
पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात ४० खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ३६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर लोहेगाव येथील हॉटेल चुल मटणचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. नागर रोडवरील जकात...





