0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 14

फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या: आमदार अमित गोरखे

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८ मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नसून स्थानिक...

ढायरीतील निकृष्ट दर्जाच्या रस्ता दुरुस्तीवर महापालिकेचा दणका; ठेकेदारावर १० लाखांचा दंड, नव्याने काम करण्याचे आदेश

0

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकल्यानंतर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्ता दुरुस्तीप्रकरणी पुणे महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने ठेकेदाराच्या खर्चातून दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ढायरी...

धनकवडीत २५.९० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; फॉरेक्स कंपनीतील कर्मचाऱ्यासह ६ जण अटकेत, चोरीचा ऐवज जप्त

0

पुणे : धनकवडी परिसरात घडलेल्या तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांच्या रोख रक्कम आणि परकीय चलन लुटीच्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराच्या फॉरेक्स कंपनीतच काम करणारा कर्मचारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहा आरोपींना अटक केली असून सुमारे २५ लाख २०...

‘पुण्याचे पोलीस आयुक्त जबाबदार’; वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळे यांची अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी

0

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या तात्काळ बदलीची किंवा सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी, कोयता गँगचा वाढता धुमाकूळ, महिलांवरील अत्याचार तसेच नुकत्याच घडलेल्या विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया...

खारघर येथील ‘ग्रामविकास भवन’ची मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी; ग्रामविकास योजनांना मिळणार नवी गती

0

नवी मुंबई : राज्यातील ग्रामविकास आणि पंचायत राज व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ‘ग्रामविकास भवन’ या अत्याधुनिक शासकीय संकुलाची आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठी उपलब्ध सुविधा तसेच पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील ग्रामविकास विभागाच्या विविध योजना...

पावसाळ्यापूर्व तयारीला वेग; मुंबई महापालिकेकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर कामे सुरू

0

मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील पावसाळापूर्व कामांना मोठ्या प्रमाणावर वेग देण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीतता आणि पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी विविध विभागांकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दरवर्षी मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे, रस्त्यांवर खड्डे निर्माण होणे आणि लोकल सेवांवर परिणाम होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने पूर्वतयारीवर...

पुणे-पिंपरी चिंचवड हादरले! संशयास्पद मृत्यूंच्या मालिकेमागे केमिकलयुक्त गावठी दारूचा घातक खेळ? नागरिकांचा पोलिस आणि एक्साईज विभागावर गंभीर आरोप

0

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात संशयास्पद मृत्यूंच्या वाढत्या घटनांनी खळबळ उडाली असून गावठी केमिकलयुक्त दारूमुळे तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात सहा जणांचा तर पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. सुरुवातीला फुगेवाडी परिसरातील मृत्यू हृदयविकार आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र पुढील तपासात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट; महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा

0

देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांची आज नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून राज्यातील सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. भेटीदरम्यान महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, परिवहन व्यवस्था, ग्रामीण विकास तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या...

वाकड पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत वर्दळीच्या बेंगळुरू–मुंबई महामार्गावरील वाकड पुलाचे रखडलेले काम आता नागरिकांच्या संतापाचा विषय बनले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्य श्रुती राम वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत पुलाचे काम तातडीने...

रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी- सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक उपलब्ध असून या प्रकल्पाचे सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या...

Copyright ©