वानवडी पोलिसांची थरारक कामगिरी – २४ तासांत गुन्हा उघडकीस; ५.८७ लाखांचे दागिने हस्तगत
पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या तपासपथकाने अतिशय कुशल तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल ₹५,८७,०५० किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने हस्तगत करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी बळकट केला आहे. प्रकरण असे की, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर आणि त्यांची पत्नी हे धावपळीत व घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस ठाण्यात आले....
मार्केटयार्ड पोलीसांची मोठी कारवाई! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद – सुमारे १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक सराईत मोटारसायकल चोरास पकडून तब्बल ₹१,६०,०००/- किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी हद्दीतील गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. यानुसार पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना एक संशयास्पद...
गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव”चा दर्जा – पुण्यात पोलिसांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाला भव्य उत्सवाचा प्रारंभ
महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” म्हणून मान्यता दिली असून तो आता अधिकृतरीत्या “महागणेशोत्सव” या नावाने साजरा होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार होणार असून सर्वत्र विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे पोलीस मुख्यालयात यानिमित्ताने 28 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साऊंड अँड लाईट डिस्प्ले, पोलीस बॅण्ड, पाईप बॅण्ड, डॉग...
अनिल भाऊ सातव पाटील यांचा लोहमार्ग वाघोली परिसरातील गणेश मंडळांना भेट – गणेशोत्सवात भक्तिभाव आणि नवचैतन्याची लहर
लोहमार्ग-वाघोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा हवेली तालुक्याचे अध्यक्ष अनिल भाऊ सातव पाटील यांनी लोहमार्ग वाघोली परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान मंडपांमध्ये उभारलेल्या आकर्षक सजावटी, पारंपरिक व आधुनिक थीमवर आधारित मूर्ती, तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांचं अनिल भाऊंनी विशेष कौतुक केलं....
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा किल्ले शिवनेरीवरून मुंबईकडे रवाना!
(पुणे) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी, 28 ऑगस्ट 2025 रोजी मोठे ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले. किल्ले शिवनेरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याशी जमलेल्या हजारो नागरिकांनी "जय शिवराय" आणि "आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले. हा मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या...
अरविंद केजरीवालांचा गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला; नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून दिली टीका
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गांधी कुटुंबावर पुन्हा एकदा थेट निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर आणि विशेषतः गांधी कुटुंबावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची झोड उठवली. केजरीवाल म्हणाले, "नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा भ्रष्टाचाराचा उघड आणि बंद केलेला खटला आहे. देशाला ठाऊक आहे की यामध्ये किती मोठे...
मुंबई सज्ज! मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी महाआंदोलन; पोलिसांना दिलं हमीपत्र, छावणीचे स्वरूप धारण केलेलं आझाद मैदान
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या लढ्याला आता नवी दिशा मिळाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे धडक मोर्चा सुरू केला असून, २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आरक्षणासाठी भव्य आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सध्या ते शिवनेरी येथे दाखल झाले असून उद्या सकाळी ते मुंबईत दाखल होणार...
पुण्यात पोलीसांचा रूट मार्च: गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडण्यासाठी सज्जता
पुणे : पुणे शहरातील नागरिकांचा उत्सव आनंदी, सुरक्षित आणि शांततेत पार पाडावा यासाठी पोलिसांनी कडेकोट तयारी केली आहे. गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दंगा काबू योजना व रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. ही मोहीम २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.५५ ते ११.४० या वेळेत पार पडली. या रूट मार्चचे मार्गदर्शन मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ...
रणांगणातील खऱ्या योद्ध्यांचा अढळ निर्धार – उन्हा-पावसाची पर्वा न करता लढणारे मराठे!
एकदा रणात उतरल्यावर मराठा योद्धे कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. मग तो कडाक्याचा उन्हाळा असो वा संततधार पाऊस, त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची जिद्द आणि शक्ती कधीही कमी होत नाही. मराठ्यांच्या रक्तातच धैर्य, पराक्रम आणि चिकाटी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गड-किल्ले वाचवण्यासाठी कितीही संकटे सोसली, तरी मागे हटले नाहीत. आजही मराठा समाजातील युवक, शेतकरी, सैनिक, क्रीडापटू, तसेच समाजकारणात...
महानगरपालिकेच्या शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांच्या हातून घडले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत शाळांमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाडू माती आणि कागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे , पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देणे, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. कार्यशाळेत शिक्षक...




