Breaking News
मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! शहरातील तलावसाठा ९४.१५ टक्क्यांवर; २४ तासांत ०.३५ टक्क्यांची वाढ
मुंबई : मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील एकूण पाणीसाठा ९४.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार हा साठा १३,६२,६२४ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी तलावांमध्ये ९३.८० टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच अवघ्या २४ तासांत ०.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या...
‘ग्रँट मेडिकल कॉलेज’च्या १८१ वर्षांच्या वैद्यकीय वारशाचा गौरव; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयांच्या १८१ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या विशेष पुस्तकाचे आज मंत्रालय, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालये :...
पुण्यात यंदा साकारतेय वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती; दगडूशेठ गणपतीच्या १३४ व्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार!
पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी भक्तांना भव्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारी आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून, ही सजावट गणेशभक्तांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य प्रतिकृती साकारली जात...
‘लाच देण्याआधी १०० वेळा विचार करा!’ तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा; म्हणाले, ‘मी अहंकारी नाही, स्पष्टवक्ता आहे’
मुंबई : महाराष्ट्रात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कठोर कारवाई सुरू असतानाच, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रोखठोक भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारवाईदरम्यान कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “माझ्या बाबतीत लाच देण्याचे धाडस कोणी करेल असे मला वाटत नाही. जर कोणी...
मिरा रोडमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅब कोसळला; स्कूल बस थोडक्यात बचावली, मोठी दुर्घटना टळली!
मिरा रोड : मिरा रोड परिसरात मेट्रोच्या सुरू असलेल्या कामादरम्यान स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातून जाणारी स्कूल बस या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या संरचनेचा भाग अचानक खाली कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटना घडली त्या वेळी रस्त्यावरून वाहनांची...
महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम
पिंपरी १७ ऑगस्ट २०२६ : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी मुख्य इमारतीसह महापालिका आवारातील कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ....
पिंपरी चिंचवडमध्ये १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा – १२ ते २३ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा रंगणार थरार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा १२ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार...
रिल्सच्या जमान्यात शॉर्टकट नको; मेहनत, वाचन आणि संघर्षातून यश मिळवा — पंतप्रधान नरेंद्र मोदींचा Gen-Z ला कानमंत्र
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडिया आणि रिल्सच्या युगात तरुणाई मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या डिजिटल कंटेंटकडे आकर्षित होत आहे. काही सेकंदांच्या व्हिडीओमधून यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याची स्वप्ने दाखवली जात असताना, यशासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका, मेहनत आणि संघर्षाला पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Z पिढीला दिला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रिम्फ ऑफ द इंडियन...
शहरात खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू; २,१६४ तक्रारींपैकी १,६०९ खड्डे बुजविले
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत वेगाने सुरू आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत पाहणी करून आवश्यकतेनुसार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आतापर्यंत २,१६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १,६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्ती सुरू...
अभिजीत दीपके यांनी इतिहासाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा अभ्यास करूनच वक्तव्य करावे; आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही – आमदार अमित गोरखे
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तसेच भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवणे, निराधार आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह श्री. अतुलजी लिमये यांनी सीजेपी (CJP) आंदोलनासंदर्भात...





