Breaking News
पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं झालं भीमाशंकर मंदिर; ऑनलाइन नोंदणी अनिवार्य, VIP दर्शन पूर्णपणे बंद
पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विकासकामांमुळे 9 जानेवारी 2026 पासून बंद असलेले हे मंदिर 15 जूनपासून दर्शनासाठी खुले झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने यावेळी काही कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात...
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा ‘500 Emails to FDA’ एल्गार; निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि प्रशासनाविरोधात संताप
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरातील मेस आणि कँटीनमधील कथित निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने ‘500 Emails to FDA’ या विशेष मोहिमेची घोषणा केली असून, कॅम्पसमधील अन्नाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) सामूहिक तक्रारी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या...
‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; शिक्षणाच्या नव्या पर्वाची पनवेलमधून सुरुवात
पनवेल : राज्यातील शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे हा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर...
रायगडच्या ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन
पनवेल : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर’ (Interactive Digital, Experimental, Administration and Learning Centre) चे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या युगाची दारे खुली...
पिंपरीत किरकोळ वादातून चाकू हल्ला; लिफ्ट परिसरातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवासी इमारतीतील लिफ्ट परिसरात शू रॅकवर थुंकण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर हाणामारीत बदलला आणि एका तरुणाने थेट चाकू काढून एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे....
पावसाळ्यापूर्वी महापालिकेची युद्धपातळीवरील तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी
पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला असून शहरातील संभाव्य पूरस्थिती, पाणी साचण्याच्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले, नदीपात्रे आणि सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण...
कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या “जागतिक शांतता कराराचे” स्वागत!
पिंपरी :- गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
पिंपरीत ‘बेरोजगार एल्गार’ आंदोलनाचा आवाज बुलंद; तरुणांच्या १० प्रमुख मागण्यांसाठी झुरळं जनता पार्टीचे धरणे आंदोलन
पिंपरी : राज्यातील वाढत्या बेरोजगारी, रखडलेल्या नोकरभरती प्रक्रिया आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात झुरळं जनता पार्टीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनापूर्वी आयोजकांच्या वतीने हवेली तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले....
भुसावळमधील वांजोळा चौक बनला ‘डेथ ट्रॅप’; महिनाभरात 10 भीषण अपघात, अनधिकृत प्रवेश मार्गांमुळे नागरिकांमध्ये भीती
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील वांजोळा चौक हा सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असून, गेल्या अवघ्या एका महिन्यात या चौकात तब्बल 10 गंभीर रस्ते अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी या चौकाला आता ‘डेथ ट्रॅप’ अर्थात मृत्यूचा सापळा अशी उपमा दिली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...





