लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात अत्यंत दणक्यात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पार पडली. उल्लेखनीय म्हणजे साहित्यरत्न दौडमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून २२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार अमित गोरखे साहेब यांचे विशेष अभिनंदन केले. या दौडला मेघराजाने देखील साथ दिली. यावेळी
मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ढोल ताशाचा देखील आनंद लुटला.







