मुंबई, मंत्रालय | दिनांक – २९ जुलै २०२५ | वेळ – दु. २ वा.
वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘वाईल्ड ताडोबा’ या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे.
या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमेटोग्राफर श्री. सुब्बीया नल्लामुथु यांना त्यांच्या वन्यजीव संरक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सुब्बीया नल्लामुथु यांच्या कॅमेऱ्यातून आपल्याला जंगलातील खऱ्या वाघाचा अनुभव मिळतो. ‘वाईल्ड ताडोबा’ माहितीपट वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल.”
कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, तसेच अनेक पर्यावरणप्रेमी, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित होते.
‘वाईल्ड ताडोबा’ हा माहितीपट केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे अधिक गती मिळणार आहे.
कार्यक्रमातील ठळक मुद्दे:
ताडोबाच्या जंगलातील खऱ्या घटनांवर आधारित डॉक्युमेंट्री