पुणे

Home पुणे Page 165

रक्षक चौक येथील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध; वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी- सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक उपलब्ध असून या प्रकल्पाचे सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी वाहतूक मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या...

पिंपरीत किरकोळ वादातून चाकू हल्ला; लिफ्ट परिसरातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवासी इमारतीतील लिफ्ट परिसरात शू रॅकवर थुंकण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर हाणामारीत बदलला आणि एका तरुणाने थेट चाकू काढून एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात...

२० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पिंपरी | प्रतिनिधी :पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनोद अनंता धुमाळ यांनी त्यांच्या कुटुंबाची तब्बल २० वर्षांपासून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोडी पोलिसांकडे केली आहे. विकास करार करूनही ना विकासकाम झाले, ना करारानुसार मोबदला मिळाला, असा आरोप धुमाळ यांनी केला. धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर...

‘ग्रँट मेडिकल कॉलेज’च्या १८१ वर्षांच्या वैद्यकीय वारशाचा गौरव; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुस्तकाचे प्रकाशन

0

मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयांच्या १८१ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या विशेष पुस्तकाचे आज मंत्रालय, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालये :...

सराईत ३ आरोपींकडून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त

0

कळेपाडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांच्या धाडसी टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ०३ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे अशी मोठी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून अंदाजे रु. 2,42,000/- चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या टोळीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली...

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज करिता प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता

0

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम एन जी एल) कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांची आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या समवेत घरगुती पाईपलाईन जोडणी कामकाज संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात झाली त्या बैठकीत कंपनीने कुशल मनुष्यबळ प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून याबाबत महापालिकेने सहकार्य करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मोरवाडी येथे उपरोक्त विषयांकित प्रकरणी एमएनजीएल यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळावा घेण्यात आला.यात संस्थेमधील प्लंबर या ट्रेडचे आजी व माजी विद्यार्थ्यांशी समक्ष संपर्क साधून...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

0

पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती अग्रस्थानी

0

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुप्रतिक्षित गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. पुण्याच्या पारंपरिक मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला मान असलेल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झाली. मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ पारंपरिक पूजन झाल्यानंतर गणरायाने विसर्जनाच्या प्रवासाला सुरुवात केली. कसबा गणपतीनंतर पुण्यातील मानाच्या उर्वरित चार गणपतींची मिरवणूक पारंपरिक क्रमाने पुढे सरकत आहे. तांबडी...

महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

0

पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" अशी क्रांतिकारी घोषणा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांना साथ देणारे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे देशासाठी दिलेले योगदान देशभक्तीची सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

RTO शेजारील बांधकामामुळे रस्त्यावर चिखल; निसरड्या रस्त्यावर अनेक नागरिक घसरले, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0

पुणे : RTO कार्यालयाशेजारी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील डंपर रस्त्यावर येताना मोठ्या प्रमाणात चिखल मुख्य रस्त्यावर आणत असल्याने परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे. सोमवारी सकाळी अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी घसरून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने ही त्यांची नियमित जबाबदारी नसतानाही तत्परता दाखवत सकाळी रस्ता धुवून स्वच्छ केला....

Copyright ©