खंडणीसाठी अपहरण! पुणे पोलिसांची तात्काळ कारवाई; २४ तासांत पिडीताची सुटका व गुन्हा उघडकीस
पुणे – वडगाव शेरी परिसरात कामावर निघालेल्या एका इसमाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक करून पिडीताची सुटका केली आहे. ही धडाकेबाज व वेगवान कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. घटनाक्रम : ३० जून २०२५ रोजी एक इसम कुबा मस्जिदजवळून...
औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, कोयते, वाहनांसह ७.६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : औंध येथील विधाते वस्तीमध्ये २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीवर चतुःश्रृंगी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १५ जणांच्या टोळीने हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्रं घेऊन परिसरात...
पुण्यनगरीच्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कामांना प्रारंभ!
पुणे (दि. ६ जुलै २०२५) : पुणे शहराच्या श्रद्धेचे प्रतीक, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी, आमदार हेमंत रसाने यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ₹४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर हेरिटेज आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत...
आई-वडिलांचाच अमानुष सौदा! पुण्यात अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीची साडेतीन लाखांत विक्री; सहा जणांना अटक
पुणे (प्रतिनिधी रेवती हिंगवे): सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विचारप्रवृत्त पुणे शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ४० दिवसांच्या बाळाला साडेतीन लाख रुपये घेऊन विकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी बाळाचे आई-वडील आणि इतर चार मध्यस्थांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे सुरुवातीला बाळ हरवल्याचा बनाव करत मुलगी पळून गेली...
चिंचवड स्टेशन परिसरात संतसृष्टीचा भव्य अनुभव | आरोग्य जागृतीसह पालखी सोहळा थाटात पार
चिंचवड स्टेशन: श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर, चिंचवड स्टेशन या शाळेत दिनांक ५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांनी सजलेला भक्तिमय शालेय पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. टाळ, मृदुंग, फुगडी, रिंगण, दिंडी या वारकरी परंपरेच्या प्रत्येक घटकास विद्यार्थ्यांनी जिवंत ठेवत वारकरी संप्रदायाची सुंदर अनुभूती दिली. या वेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव यांचे वेश परिधान करून...
पवना धरणातून विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पिंपरी-चिंचवड : पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून, धरण प्रशासनाने आज (दि. ६ जुलै) सकाळी ८ वाजल्यापासून पवना नदीपात्रात ८०० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरण पूरनियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार, सध्याचा पाणीसाठा ७४.६४% इतका भरलेला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची स्थिती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सपत्नीक शासकीय महापूजा; आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तिभावाने नमतं स्तक
पंढरपूर (दि. ६ जुलै): आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत हरिनामाच्या गजरात भक्तिभावाने न्हालेलं वातावरण पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा फडणवीस यांच्यासह सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करून राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचा विधी पार पडला. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि पोशाख अर्पण करण्यात आला. पूजेचा संपूर्ण...
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! समुद्रकिनाऱ्यावरील ‘सीसाईड प्रोमेनेड’ १५ जुलैपासून खुली होणार – दोन प्रमुख पट्ट्यांमध्ये प्रवेश
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्याची चाहत्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. बहुप्रतिक्षित आणि आकर्षक ‘सीसाईड प्रोमेनेड’ १५ जुलै २०२५ पासून सर्वसामान्यांसाठी अधिकृतपणे खुली होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या पट्ट्यांवरून मुंबईकरांना समंदराच्या लाटांसोबत चालण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा अनुभव मिळणार आहे. दोन प्रमुख पट्ट्यांमध्ये प्रवेश:हा सीसाईड प्रोमेनेड दोन टप्प्यांमध्ये खुला करण्यात येणार आहे. 1) नेहरू प्लॅनेटेरियमजवळील पट्टा –...
सात गुन्हेगार, नऊ पिस्तूल आणि आमदाराच्या हत्येचा कट! तळेगाव दाभाडे येथील कारवाईत उघड झाली भीषण बाब – शेळके यांनी विधानसभेत उघड केला खळबळजनक सवाल
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात गुप्त माहितीनुसार मोठी कारवाई करत एक मोठा कट उघडकीस आणला. यामध्ये सात सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ९ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीतील गुन्हेगारांवर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट व तोडफोड अशा...
२० वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येणं! ‘व्हिक्टरी रॅली’मध्ये उद्धव-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, मराठीच्या मुद्यावर ठोस भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर वरळीतील एनएससीआय डोम येथे एकत्र येणार आहेत. ही 'व्हिक्टरी रॅली' मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यात मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणारी आहे. मागील भेट आणि दूरावलेली वाट:याआधी दोघे बंधू...




