Breaking News

Home Breaking News Page 326

खंडणी विरोधी पथक-२ची मोठी कारवाई; मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद

0

पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक-२ ने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. तसेच मोक्का गुन्ह्यातील फरारी व पाहिजे...

२० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पिंपरी | प्रतिनिधी :पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनोद अनंता धुमाळ यांनी त्यांच्या कुटुंबाची तब्बल २० वर्षांपासून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोडी पोलिसांकडे केली आहे. विकास करार करूनही ना विकासकाम झाले, ना करारानुसार मोबदला मिळाला, असा आरोप धुमाळ यांनी केला. धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर...

रायगडच्या ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन

0

पनवेल : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर’ (Interactive Digital, Experimental, Administration and Learning Centre) चे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या युगाची दारे खुली...

‘ग्रँट मेडिकल कॉलेज’च्या १८१ वर्षांच्या वैद्यकीय वारशाचा गौरव; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुस्तकाचे प्रकाशन

0

मुंबई : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयांच्या १८१ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या विशेष पुस्तकाचे आज मंत्रालय, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालये :...

एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मानवी केंद्रित जागतिक एआय परिसंस्थेची हाक; योग्य धोरणांनीच तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणाम शक्य

0

नवी दिल्ली : एआय इम्पॅक्ट समिटच्या ‘लीडर्स प्लेनरी’ सत्रात जागतिक नेत्यांसमोर केलेल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक परिसंस्था उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तंत्रज्ञानातील प्रत्येक मोठा बदल मानवजातीसाठी आव्हानांसोबत संधीही घेऊन येतो, आणि एआयची वाढ ही अशाच ऐतिहासिक टप्प्यांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले. या परिषदेत विविध देशांचे धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक, संशोधक आणि...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त

0

पुणे : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली...

वाकड-हिंजवडी-ताथवडे-पुनावळेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करा; नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी-चिंचवड : वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करत नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन साद केले आहे. वाढती वाहनसंख्या, हिंजवडी आयटी पार्कमधील मोठ्या प्रमाणातील कर्मचारीवर्ग, वाढती लोकसंख्या आणि विविध विकासकामांमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर या परिसरातील प्रमुख...

‘सहकार नव-क्रांती’चा महाराष्ट्रात शुभारंभ; सहकार क्षेत्राला आधुनिकतेची नवी दिशा!

0

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि नव्या संधींची जोड देण्याच्या उद्देशाने ‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल,...

धक्कादायक अमानवी कृत्य! नवजात बाळाला धावत्या बसमधून रस्त्यावर फेकलं; दोघांना अटक – समाजमन हादरले

0

परभणी | १६ जुलै २०२५ – महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातून एक थरारक व मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात बाळाला थेट रस्त्यावर फेकून देण्यात आलं. या अमानवी वागणुकीमुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी ऋतिका ढेरे व अल्ताफ शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा सविस्तर तपशील ▪️ ही धक्कादायक घटना...

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती अग्रस्थानी

0

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुप्रतिक्षित गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. पुण्याच्या पारंपरिक मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला मान असलेल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झाली. मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ पारंपरिक पूजन झाल्यानंतर गणरायाने विसर्जनाच्या प्रवासाला सुरुवात केली. कसबा गणपतीनंतर पुण्यातील मानाच्या उर्वरित चार गणपतींची मिरवणूक पारंपरिक क्रमाने पुढे सरकत आहे. तांबडी...

Copyright ©