पुण्यातील वानवडी पोलिसांची कठोर कारवाई; बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस ४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा!
पुणे शहरातील वानवडी पोलिसांनी एका गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात उल्लेखनीय तपास करत आरोपीस शिक्षा होण्यासाठी सक्षम पुरावे सादर केले. वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक ५९६/२०१७ नुसार, भादंवि कलम ३५४, ३५४ (A), ३५४ (ए) सह ‘पोस्को’ कायदा २०१२ अंतर्गत कलम ७, ८, ११, १२ नुसार, आरोपी आकाश महादेव कांबळे याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. ही संतापजनक घटना...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवून त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट घडवून आणला. वाबळेवाडी आणि जळिंदरनगर येथील शाळांमध्ये त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे केवळ विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली नाही, तर त्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे....
उंद्री–हांडेवाडीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा; राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती बांदल यांची १२ पाण्याच्या टाक्यांची महत्त्वाकांक्षी योजना
पुणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या दक्षिण उपनगरांमध्ये गंभीर बनलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता मोठा उपाय सुचवण्यात आला आहे. Nivrutti Bandal यांनी उंद्री, हांडेवाडी, पिसोली, ऑटाडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आणि उंद्री हिलटॉप परिसरातील लाखो नागरिकांना दिलासा देण्यासाठी किमान १२ उंच पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त Naval Kishore Ram यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलच्या...
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर; २५ उमेदवार रिंगणात, स्वबळावर लढणार निवडणूक
पुणे | प्रतिनिधी आगामी २०२५-२६ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (AAP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे शहर समितीच्या वतीने मंगळवारी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, “पुणे महापालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून...
नवले पुलाजवळील भूमकर पुलावर पुन्हा भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील नऱ्हे परिसरातील भूमकर पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपासवरील या पुलावर एका मालवाहू कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यानंतर कंटेनरने पुढील वाहनांना धडक दिली. उपलब्ध पोलिस माहितीनुसार या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. ब्रेक...
पुण्यातील ‘ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’चा वाढता कहर!
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजकाल शिक्षणापेक्षा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हमुळे घडणारे भयानक अपघातच चर्चेचा विषय बनले आहेत. शनिवार-रविवारी शहरात उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्या, बाहेरून आलेले विद्यार्थी, कॉर्पोरेटमधील तरुणाई, मोठा पॉकेटमनी, पबची वाढती संख्या… या सगळ्यांनी मिळून पुण्याचे रस्ते डेन्जर झोन बनवले आहेत. आणखी चिंतेची बाब म्हणजे, अनेक तरुण व विद्यार्थी मजा-मस्तीच्या भरात मद्यपान करून वाहन चालवतात आणि...
‘काही जणांच्या कृत्यामुळे निष्पाप नागरिकांना त्रास होऊ नये’; गणेशोत्सवातील ध्वनी व वायुप्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाची गंभीर चिंता
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (Suo Motu) जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला के. गोखले यांच्या खंडपीठाने मोठ्या आवाजातील संगीत, परवानगीच्या वेळेचे उल्लंघन आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालयाने स्पष्ट केले की गणेशोत्सव आणि मिरवणुका आयोजित करण्यास आक्षेप नाही; मात्र उत्सव साजरा...
विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात; घराघरांत पोहोचत विकासाचा संदेश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, विकासनगर–किवळे परिसरात भाजप पॅनलचा प्रभावी झंझावात पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध नियोजन, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे युतीचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि...
वाकड फाटा येथील दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलला भीषण आग; धुरामुळे १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी-चिंचवड : वाकड फाटा परिसरातील दत्त मंदिर रस्त्यावर असलेल्या दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागून १९ वर्षीय युवकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस...
सफाई सेवकांचा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा संकल्प
पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी सेक्टर २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे सफाई सेवकांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या...










