राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता
पिंपरी :- 'महापौर चषक ही केवळ स्पर्धा नसून राज्यातील नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे. पिंपरी चिंचवड शहर क्रीडा संस्कृतीला चालना देणारे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे, आणि अशा स्पर्धांमधून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आहे, ' असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ...
ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
पुणे, : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून, या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोपर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यातील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र...
पीसीएमसीचा मालमत्ता कर भरणाऱ्यांना मोठा दिलासा! ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरा आणि मिळवा ४% सवलत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू
पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) शहरातील मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, कर संकलन वाढविणे आणि नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील...
आषाढी वारीसाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! पालखी मार्गाची महापौर रवि लांडगे यांची पाहणी; वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याच्या प्रशासनाला सूचना
पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी...
ग्रँड टूरमुळे पुणेकरांची ‘ग्रँड’ कोंडी; वाहतूक नियोजन फसलं, नागरिकांचा संताप
पुणे शहरात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे सोमवारी सामान्य पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचे नियोजन अत्यंत ढिसाळ ठरल्याने शहरात अभूतपूर्व ट्रॅफिक जाम झाला. “हा रस्ता बंद, तो रस्ता बंद… मग आम्ही जायचं तरी कसं?” असा सवाल करत संतप्त पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला. स्पर्धेसाठी शहरातील...
वकील वर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र कमिटी कार्यरत – ॲड. सचिन पानी यांची ग्वाही
पिंपरी–चिंचवड :वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या व्यावसायिक अडचणी तसेच सामाजिक व कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून वकील वर्गाच्या हितासाठी स्वतंत्र कमिटी कार्य करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी दिली. पिंपरी–मोरवाडी...
वाघोली पोलिसांची कारवाई – दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे | २२ जुलै २०२५ – पुणे शहरातील वाघोली व हडपसर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांचे दागदागिने लांबवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून अचूक कारवाई मा. वरिष्ठांच्या सूचनांनुसार सुरू असलेल्या गुन्हा...
कोंढवा येथे मोठी कारवाई: १३.६ लाखांच्या मेफेड्रॉनसह एक जण अटक, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची यशस्वी धडक
पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (Anti-Narcotics Cell - 2) ने मोठी यशस्वी कारवाई करत १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, कोंढवा परिसरातील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर...
पुणे शहरात ट्रिपल सीट वाहनचालकांवर मोठी कारवाई; दोन दिवसांत २६४९ प्रकरणे नोंद
पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक १२/०२/२०२६ व १३/०२/२०२६ रोजी पुणे शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम हाती घेतली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक शिस्तीचा अभाव लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. शहरभर एकाच वेळी धडक कारवाई पुणे शहरातील प्रमुख रस्ते, गर्दीचे चौक आणि वाहतूक दाटीच्या भागांमध्ये एकाच...
रमाईंचा त्याग आणि समर्पणच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामागची खरी ताकद; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
पिंपरी - त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर या संघर्ष, त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, पण त्या विचारांना उभं राहण्यासाठी जी शांत, नि:स्वार्थ ताकद लागते, ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच पिंपरी येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे...










