जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांचा विशेष
पिंपरी:- जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर माई ढोरे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅड.गोरक्ष लोखंडे,माजी नगरसदस्या उषा मुंढे,अनुराधा गोरखे,अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनता...
पुण्यात भेसळयुक्त पनीरचा मोठा साठा जप्त – अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई!
पुणे, ७ मार्च २०२५ – पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त कारवाई करत मांजरी खुर्द येथील गोडाऊनवर धाड टाकून तब्बल १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर आणि ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला...
परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मोठा प्रतिसाद!
पुणे : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. ११६ दुचाकींचा भव्य ताफा – २३२ महिला...
पुणेकरांना सायबर गुन्ह्यांचा फटका – २०२४ मध्ये ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान! पुणे पोलिसांचा सायबर सुरक्षेसाठी मोठा निर्णय
पुणे, ८ मार्च: महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये पुणेकरांना सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. एकूण १,५०४ प्रकरणांमध्ये एवढा मोठा फटका बसल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि ठाणे या तिन्ही शहरांतील एकत्रित नुकसानाच्या तुलनेत पुण्याचे नुकसान पाचपट अधिक आहे. मुंबईत ४,८४९ प्रकरणांमध्ये ₹८८८ कोटींचा तोटा, ठाण्यात...
थोर महिलांच्या विचारांचा जागर! चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारल्या कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका, अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा
पुणे, ८ मार्च: महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर साईनाथ मंडळ ट्रस्ट व नवीन मराठी शाळेच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी भारताच्या थोर कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून, त्यांच्या विचारांवर भाष्य करत प्रभावी वकृत्व सादर केले. या अनोख्या उपक्रमाने महिला सशक्तीकरणाचा संदेश देत उपस्थितांची मने जिंकली. प्रेरणादायी उपक्रम, ऐतिहासिक...
पुण्यातील ‘बर्गर किंग’ विरुद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड; सुप्रीम कोर्टाने स्थानिक हॉटेलला दिली तात्पुरती दिलासा!
(नवी दिल्ली) ७ मार्च २०२५ :- सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, ज्यामुळे पुण्यातील 'बर्गर किंग' या स्थानिक रेस्टॉरंटला त्याच नावाने व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता. अमेरिकेतील प्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड 'बर्गर किंग कॉर्पोरेशन' आणि पुण्यातील या रेस्टॉरंटमध्ये २०१४ पासून व्यापारचिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या...
HSRP नंबर प्लेटच्या किंमतीवर विधानसभेत फडणवीसांचा खुलासा! स्टिंग ऑपरेशन प्रकरणावरही उत्तर
मुंबई (विधानभवन): विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेटच्या किंमतीबाबत सविस्तर खुलासा करत विरोधकांनी उपस्थित केलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटच्या किंमती सर्वाधिक असल्याचा अपप्रचार सुरू असून त्यामध्ये कोणताही तथ्याधार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी इतर राज्यांतील HSRP नंबर प्लेटच्या अधिकृत दरांची पावती सभागृहात दाखवत महाराष्ट्रातील दर तुलनेने कमी...
पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत आमदार महेश लांडगे यांची सकारात्मक बैठक
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेऊन पाणी पुरवठा आणि नवीन जलस्रोत निर्मितीवर सखोल चर्चा केली. या चर्चेदरम्यान, शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षित करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारला पाठवलेल्या...
ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा
ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा - महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित "Culinary ID " ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे:- भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary ID ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य स्वागत-सत्कार!
कोल्हापूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैजारवाडी, कोल्हापूर येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या पवित्र दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध कार्यक्रर्यांमध्ये सहभाग घेतला. आज संध्याकाळी ७.३५ वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर भाजपा महिला...














