सामाजिक

Home सामाजिक Page 132

*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”

0

*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या  प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...

लातूरमध्ये खळबळजनक घटना! छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अजितदादा समर्थकांकडून बेदम मारहाण; पत्रकार परिषदेनंतर वाढली तणावाची स्थिती

0

महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. लातूर येथील विश्रामगृहात खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे काही घडले, ते अत्यंत धक्कादायक होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी तेथे आले आणि त्यांनी अलीकडील कृषीमंत्री यांच्या कृतीविषयी तटकरे यांना थेट जाब विचारला. या चर्चेने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले रोष प्रकट केला. मात्र...

“स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” मोहिमेला नवा आयाम! २२ थ्रीडी शिल्पांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार!

0

(दि. २१ जुलै २०२५) – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या कसबा मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणाला आता नवीन उंची मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” या अभियानाअंतर्गत तयार झालेल्या २२ ठिकाणी उभारलेल्या थ्रीडी शिल्प कलाकृतींचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये मिशन अंतर्गत कसब्याचे क्रॉनिक स्पॉट्स...

चार वर्षांनंतरही वाजपेयी मेडिकल कॉलेजवर मान्यतेची टांगती तलवार – एनएमसी आणि एमयूएचएसची नोटीस पाठवून कारवाईची शक्यता!

0

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय गेली चार वर्षे कार्यरत असूनही, अद्यापही वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा आणि अध्यापन कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) या दोन प्रमुख संस्थांनी कॉलेजला नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह: २०२१-२२ मध्ये प्रथम तुकडीचा प्रवेश...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती – 1930 किंवा 1945 डायल केल्यास सायबर फसवणुकीतील पैसे थांबवणे शक्य!

0

राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचा गंभीर विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की, "कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यात जर नागरिकांनी 1930 किंवा 1945 हा हेल्पलाइन क्रमांक तातडीने डायल केला, तर फसवणूक झालेल्या पैशांचा प्रवास त्वरित रोखता येईल." हे सिस्टिम राष्ट्रीय पातळीवर सायबर क्राईम हेल्पलाइनशी जोडले गेले आहे...

औद्योगिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘जीईसी’चे उद्घाटन होणार; भारत-आखात उद्योग संवादाला चालना

0

जगभरात शिक्षण व उद्योगाच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र ओळखीने नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ व सहाय्यक संस्थांच्या वतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी १६ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान दुबईतील हॉटेल कॉनरॉड येथे भव्य ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह (GEC) आयोजित करण्यात आले असून याचे उद्घाटन महाराष्ट्राचे औद्योगिक विकास मंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या कॉन्क्लेव्हचे आयोजन पिंपरी...

बीएमसीच्या नव्या धोरणाविरोधात मुंबईकरांचा आवाज बुलंद, ‘हेरिटेज’ आणि नागरी सहभागाला दूर लोटण्याचा आरोप

0

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रस्तावित केलेल्या आयकॉनिक बिल्डिंग पॉलिसीवर मुंबईकरांनी जोरदार आक्षेप नोंदवत, हे धोरण व्यावसायिकीकरणावर आधारित, केंद्रीकृत नियंत्रणाचे आणि सांस्कृतिक वारशाला दूर करणारे असल्याचा आरोप केला आहे. 'सेव्ह मुंबईज आयकॉनिक बिल्डिंग्स' या नागरिकांच्या गटाने एक ऑनलाइन याचिका सादर करून ही धोरण गंभीर पुनर्विचारास पात्र असल्याचे सांगितले आहे. मुंबईतील गिरगावच्या चाळी, गामदेवीचे बंगल्यांचे वारसास्थळ, मरीन ड्राईव्हचे आर्ट डेको अपार्टमेंट्स...

मुंबईत ओला-उबर-रॅपिडो चालकांनी तात्पुरती आंदोलनविराम जाहीर केला; सरकारला दिला ‘शब्द पाळा अन्यथा पुन्हा आंदोलन’ इशारा!

0

मुंबई | मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेले ओला, उबर व रॅपिडोसारख्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांचे आंदोलन अखेर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशात तसेच महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये या संपाचा मोठा फटका नागरिकांना बसत होता. मात्र, भारतीय अ‍ॅप आधारित वाहतूक कर्मचारी महासंघाने (IFAT) शुक्रवारी चालकांना कामावर परतण्याचे आवाहन करत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. सरकारकडून सकारात्मक संकेत राज्य परिवहन...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार अमल महाडिक यांच्याकडून ₹3.51 लाखांची देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार!

0

मुंबई | राज्यातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज एक स्तुत्य उपक्रम घडला. विधान भवन, मुंबई येथे कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹3.51 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाडिक यांचे मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “राजकारण केवळ सत्तेसाठी नसून, सामाजिक जबाबदारी निभावण्याचेही एक साधन आहे. अशा प्रकारचे...

गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत

0

वारजे माळवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तत्परतेमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा टळला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगारास गावठी पिस्टल आणि काडतूसासह जेरबंद करण्यात आले. ही कारवाई १२ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. सदर गुन्हेगाराचे नाव विकी ऊर्फ गंग्या विष्णू आखाडे (वय २७), रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी असे असून त्याच्या अंगझडतीत ४०,०००/- किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल...

Copyright ©