महाराष्ट्र
स्वेटरने दिलं जीवनदान! दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली महिला; आंबेगावमध्ये भीतीचे सावट
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव चिचगाईवस्ती येथे घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका २९ वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, मात्र तिच्या अंगावरील स्वेटरमुळे तिचं प्राण वाचलं. या प्रसंगानंतर संपूर्ण गावात भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेतील पीडित महिला अश्विनी शिवाजी ढोबळे या रात्री सुमारे ९ वाजता घराबाहेर लघुशंकेसाठी गेल्या होत्या. अंधाराचा फायदा...
पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न युवकांमधील कौशल्य आणि नव संकल्पना सादरीकरणास संधी देण्याची गरज-युवराज पाटील
पुणे : भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025- 26 चे 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे ...
कुदळवाडी-चिखली परिसरातील मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शत्रुघ्न काटेंनी केली सामाजिक कार्याची प्रशंसा!
कुदळवाडी आणि चिखली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत घेतला. समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विशेष कौतुक केले आणि आयोजक दिनेश यादव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजासाठी आरोग्याचा मोठा उपक्रम या शिबिरात सामान्य सर्दी-खोकल्यापासून ते हृदयरोग,...
पुण्यात तोतया आयपीएस अधिकाऱ्याचा भंडाफोड! पोलिस आयुक्तालयातच उघडकीस आली सागर वाघमोडेची फसवणूक
पुणे शहरात धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या सागर वाघमोडे या तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक करत होता. आणखी धक्कादायक म्हणजे या तोतया अधिकाऱ्याचा भांडाफोड थेट पुणे पोलिस आयुक्तालयातच झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांच्या माहितीनुसार, सागर वाघमोडे हा स्वतःला परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका! मशिद बंदरजवळ लोकलखाली चिरडले ४ प्रवासी; २ ठार – मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प!
मुंबईच्या लोकल प्रवासाला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.या आंदोलनाचा फटका थेट प्रवाशांना बसला असून, मशिद बंदर स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात लोकलखाली ४ जण उडाले, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश असल्याची...
‘सी लिंकपासून रिंग रोडपर्यंत – उज्ज्वल महाराष्ट्रासाठी भव्य पायाभूत क्रांती!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अधोसंरचना समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्रात वाहतूक, संपर्क आणि विकास यांचा नवा अध्याय उलगडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज अधोसंरचना समितीची बैठक पार पडली, ज्यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्राच्या भावी विकासाचा आराखडा अधिक स्पष्ट झाला आहे. बैठकीत उत्तन–विरार सी लिंक प्रकल्पाचा विस्तार वधावन बंदरापर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली. हा निर्णय मुंबईच्या उत्तर-दक्षिण वाहतूक साखळीला अधिक बळकट...
आंबेगाव पोलिसांची जलद कारवाई! तरुणावर लोखंडी हत्याराने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करणारे तिघे आरोपी जेरबंद
पुणे शहरातील आंबेगाव परिसरात घडलेल्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच प्रभावी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी हत्याराने जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींची सुटका होऊ शकली नाही. घटनेचा तपशील : घटना दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सीसीडी कॅफे, पुणे–बेंगलोर हायवे, आंबेगाव बु. परिसरात घडली. किरकोळ वादातून उफाळलेल्या...
स्वारगेट वाहतूक पोलिसांची धडक कारवाई! 324 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई – वाहतूक नियम तोडणाऱ्यांना इशारा
पुणे शहरातील वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून सतत कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, स्वारगेट चौक परिसरात आज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी मोहीम राबविण्यात आली. पोलीस उप आयुक्त कार्यालय (वाहतूक), पुणे शहरया मोहिमेदरम्यान एकूण 324 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे कठोर शिक्षा होणार असल्याचा इशारा पोलिसांनी...
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक : जनहिताचे अनेक निर्णय जाहीर
आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांच्या कल्याणाशी थेट संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विकास, रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात ठोस निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रमुखतः ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना लागू करणे आणि नागरी भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी वाढविण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी...
संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...




