Breaking News

Home Breaking News Page 13

नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा दमदार निर्धार; अमरनाथ राजूरकरांना एकनाथ शिंदेंकडून विजयाचा आशीर्वाद

0

मुंबई : विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजूरकर यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देत विजयाचा आशीर्वाद दिला आणि महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. या भेटीवेळी राज्यातील...

मेंढपाळ बांधवांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी शासनाची मोठी पुढाकार; कायमस्वरूपी योजनेसाठी माहिती संकलनाचे निर्देश

0

मुंबई : राज्यातील भटकंती करणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी आणि त्यांच्या विविध समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मेंढपाळ समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी व्यापक योजना तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत भटकंती करणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांची अचूक माहिती संकलित करून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आणि परिणामकारक योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात...

भारताच्या युवा हॉकीचा आशियाई डंका! पुरुष संघ आशिया कप विजेता, महिला संघाने जिंकले कांस्यपदक

0

नवी दिल्ली : भारतीय हॉकीसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण ठरलेल्या U-18 आशिया कप 2026 स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दमदार कामगिरी करत देशाचा झेंडा उंचावला आहे. भारतीय पुरुष U-18 हॉकी संघाने शानदार खेळाच्या जोरावर आशिया कप 2026 चे विजेतेपद पटकावले, तर भारतीय महिला U-18 हॉकी संघाने कांस्यपदक जिंकत भारतीय क्रीडा क्षेत्राला दुहेरी आनंद दिला आहे. या दोन्ही...

मुंबई-पुणे महामार्गालगत महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ; खारघर परिसरात हत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

0

पनवेल : मुंबई-पुणे महामार्गालगत खारघर परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून मृत्यूमागे घातपात अथवा हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खारघर परिसरातील मुंबई-पुणे महामार्गाच्या कडेला काही नागरिकांना...

दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

0

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार आज महापालिकेने केला आहे, यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० देशी रोपांची लागवड...

ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती

0

पुणे,  : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून, या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोपर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यातील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र...

देहूरोडमध्ये वाहतूक कोंडीला दिलासा! केंद्रीय विद्यालय आणि ऑर्डनन्स फॅक्टरीदरम्यान दोन भुयारी मार्गांना हिरवा कंदील

0

देहूरोड : देहूरोड-निगडी मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी दरम्यान प्रस्तावित असलेल्या दोन भुयारी मार्गांना (अंडरपास) तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी...

‘दोन महिन्यांत कंपनीचं मोठं नुकसान केलं’; अभिनेता गौरव मालणकरने सांगितला संघर्षमय प्रवासाचा मजेशीर किस्सा

0

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव मालणकर याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत एक मजेशीर आणि तितकाच प्रेरणादायी किस्सा सांगितला आहे. अभिनय क्षेत्रात आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरवने सुरुवातीला विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले होते. मात्र, नोकरी आणि अभिनय यामधील निवड करताना त्याने मनाचा कौल ऐकत अखेर अभिनय क्षेत्राची वाट निवडली. या प्रवासात आलेले अनुभव आणि...

वाशीममध्ये भरदिवसा थरार! किरकोळ वाहन वादातून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट

0

वाशीम : महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रस्त्यावर वाहन चालविताना एका वाहनाने दुसऱ्या वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने काही नागरिकांवर लोखंडी रॉड, काठ्या आणि इतर घातक हत्यारांनी बेछूट हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रविण राऊत, राजेश राऊत, प्रतीक राऊत, अंकुश सोंटक्के...

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई...

Copyright ©