Breaking News
IISER पुणे विद्यार्थी आंदोलनावर संस्थेची भूमिका; बहुतांश मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न, मात्र विद्यार्थी संघटनेच्या महासचिवावरील निलंबन कायम
पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या बहुतांश मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि प्रक्रिया उभारण्याचे काम सुरू असल्याचे संस्थेने म्हटले आहे. मात्र, विद्यार्थी संघटनेच्या महासचिवावरील निलंबनाचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याचे संस्थेच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करताना...
सफाई सेवकांचा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा संकल्प
पिंपरी, दि. १२ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत निगडी सेक्टर २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे सफाई सेवकांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या...
मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या विविध कार्यालयास भेट
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन...
पाकिस्तानी ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ रिलीज होताच बवाळ; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, मोठा वाद पेटला
पाकिस्तानात नुकताच प्रदर्शित झालेला लोकप्रिय ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच या ड्रामाने सोशल मीडियावर आणि धार्मिक संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. कथानकातील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत विरोधकांनी शोवर टीकेचा झंझावात सुरू केला आहे. ड्रामाच्या ट्रेलरपासूनच वादाची चिन्हे दिसू लागली होती; मात्र पूर्ण एपिसोड प्रसारित झाल्यावर टीकेची लाट...
भारतीय सायकलिंगला गौरवशाली क्षण; हर्षवीर सिंग यांना ‘ब्ल्यू जर्सी’ने सन्मानित
पुणे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सर्वोत्तम भारतीय सायकलपटू श्री. हर्षवीर सिंग यांना ब्ल्यू जर्सी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भारतीय सायकलिंगच्या क्षितिजावर देशी खेळाडूंची चमक अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. यावेळी स्पर्धेतील इतर विजेत्या भारतीय सायकलपटूंनाही पदके प्रदान करण्यात आली, तसेच...
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण; १ मे महाराष्ट्र दिनी नागरिकांच्या सेवेत, प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित
मुंबई–पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेला बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास आला असून, येत्या १ मे २०२६, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासात मोठी सुधारणा होणार असून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात...
आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘चितळे बंधू’ दुकानफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्ह्यांचा उलगडा
पुणे : आंबेगाव परिसरातील नामांकित ‘चितळे बंधू’ दुकानात घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹1,24,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते दि. 26 जानेवारी रोजी सकाळी...
‘कॅश क्रॅश’ची बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरतेय का? सोन्या-चांदीच्या दरांनी गाठले विक्रमी शिखर, गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायांकडे कल
बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या गूढ आणि धक्कादायक भविष्यवाण्यांमुळे त्यांना “बाल्कनचे नास्त्रेदमस” असे संबोधले जाते. युद्धे, आर्थिक संकटे, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक उलथापालथींचे त्यांनी केलेले भाकीत अनेक वेळा खरे ठरल्याचा दावा केला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाकडे जगभरातील लोक गांभीर्याने पाहतात. २०२६ संदर्भातील त्यांच्या एका भविष्यवाणीने सध्या पुन्हा खळबळ उडवली आहे....
महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी...









