पुणे

Home पुणे Page 69

पिंपरी, १० मार्च २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८० तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

0

नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत...

धाडसी बचाव मोहिम! पोलिसांची ‘मानवी साखळी’ आणि शर्तीचा निर्धार; एका नागरिकाचे प्राण वाचवले!

0

खराडी पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आज मुळा-मुठा नदीवर पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने संबंधित भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस पथक गेले असता एक धक्कादायक घटना समोर आली. मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी एक इसम अडकलेला दिसून आला. वाढत्या पाण्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण...

संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या पालखीचा भक्‍तीमय सोहळा सुरू! आषाढीवारी २०२५ मध्ये लाखो वारकऱ्यांचा जनसागर, भक्तिरसात न्हालेली महाराष्ट्राची माती

0

आळंदी (जि. पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा २०२५ मध्ये अत्यंत भक्तिभावाने, शिस्तबद्धतेने आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघाला आहे. महाराष्ट्राच्या भूमीतून निघालेला हा आषाढी वारीचा अखंड भक्तिरथ पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा आणि श्रद्धेची शिखरं गाठतो आहे. ज्ञानोबारायांची पालखी – भक्ती, परंपरा आणि शिस्त यांचं प्रतीक: वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषात, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ...

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

0

 पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी संपूर्ण रुग्णालयाचा सविस्तर आढावा उपमहापौर यांना दिला. यावेळी उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली....

“वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा” उत्सवात रंगणार पुणे; रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

0

पुणे, ११ जुलै २०२५ : पारंपरिक वाद्यसंस्कृती आणि सांगीतिक परंपरेला जपणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा विशेष सोहळा दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे येथील ग्राउंड झिरो या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मा. श्री....

वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळत सामाजिक कार्याची शिकवण! कात्रजमध्ये भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिर यशस्वी.

0

कात्रज, पुणे – सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे आदर्श शिक्षक किरण पाटील घोरतळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. या शिबिराचा लाभ तब्बल 1856 नागरिकांनी घेतला असून 38 जणांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. शिबिराची वैशिष्ट्ये: या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, डेंटल तपासणी, रक्तदान शिबिर तसेच आधार...

भक्ती, फिटनेस आणि पर्यावरणाचा अनोखा संगम; दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, २३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग

0

पुणे : वारकरी परंपरेचा आध्यात्मिक वारसा आणि आधुनिक काळातील आरोग्य-जागरूकतेचा सुंदर मिलाफ घडवून आणणारी इंडो अथलेटिक्स सोसायटी आयोजित दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. देहू येथील गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या सायकल वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग घेत २३५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत पंढरपूर गाठले. यंदा सायकल वारीच्या दहाव्या पर्वानिमित्त विक्रमी सहभाग...

पुणे: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 30 प्रमुख रस्त्यांवर 12 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांवर बंदी | संपूर्ण यादी पाहा.

0

पुणे वाहतूक: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या वाहतूक पोलिसांनी 30 प्रमुख ठिकाणी अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी 12 ऑगस्टपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, असे वाहतूक विभागाचे डीसीपी रोहिदास पवार यांनी रविवारी सांगितले. पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि...

पुण्यात भीषण दुर्घटना! कॅम्प परिसरात स्लॅब कोसळला; तरुण मजुराचा मृत्यू, चौघेजण गंभीर जखमी – बिल्डर व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

0

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. साचापीर स्ट्रीटवरील ओयसिस हॉटेल शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात स्लॅबचा भाग कोसळून एक तरुण मजूर ठार झाला असून, चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.  स्लॅब कोसळताना सुरक्षा नियमांकडे...

चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘UNCLOG Chakan MIDC’ मोहिमेला गती; औद्योगिक प्रतिनिधींचा निर्धार

0

चाकण औद्योगिक पट्टयातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि या परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी ‘UNCLOG Chakan MIDC’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला उद्योग जगताच्या विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा असून, राज्य सरकारदरबारी भोसरीप्रमाणेच चाकण समस्यामुक्त होण्यासाठीही ठोस पावले उचलली जात आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचे नियोजन असून, त्यात चाकण औद्योगिक...

Copyright ©