जगातील सर्वात उंच स्मारक – स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिलेले बलिदान आजही जनमानसात प्रेरणादायी आहे. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांचा इतिहास पुढील पिढ्यांना समजावा यासाठी जगातील सर्वात उंच स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाला “स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण” असे नाव देण्यात आले आहे. या भव्य स्मारकाच्या उभारणीमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अस्मितेचे प्रतीक म्हणून जगभरात नवे स्थान...
दिल्ली-पुणे विमान प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेतून ₹१.८० लाखांची चोरी; विमानतळ सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
पुणे: विमान प्रवासादरम्यान पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून दिल्ली-पुणे एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशाच्या बॅगेतील ₹१.८० लाखांची रोकड चोरीला गेली आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी प्रासन नाहर (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) हे दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाने प्रवास करत होते. त्यांनी आपली बॅग दिल्लीतील मेट्रो स्थानकावरील चेक-इन काउंटरवर दिली होती. मात्र, पुणे विमानतळावर बॅग मिळाल्यानंतर त्यांनी ती उघडून...
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ....
इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी १ वाजता ‘या’ ९ संकेतस्थळांवर उपलब्ध; निकालानंतर गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचीही सुविधा
मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववी विभागीय मंडळांचा समावेश या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...
पुण्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई : खराडी परिसरातून २७ ग्रॅम एमडी जप्त, दोन जणांना अटक; १२.४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खराडी परिसरातून मेफेड्रॉन (एम.डी.) या घातक अमली पदार्थासह दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तब्बल १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांवर मोठा आघात केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी...
कोंढवा पोलीस स्टेशनच्या युनिट-०५ पथकाने रेकॉर्डवरील आरोपीस गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह पकडले
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कोंढवा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या युनिट-०५ पथकाने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूससह एक गंभीर आरोपी जेरबंद केला आहे. दि. २४ एप्रिल २०२५ रोजी, गस्तीदरम्यान पोलीस अभिलेखावर असलेल्या आरोपी मौला ऊर्फ मौलाना रसुल शेख (वय २२ वर्षे, रा. माऊली कृपा बिल्डींग, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. गोपनीय माहितीवरून कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-०५ च्या पोलीस स्टाफला गोपनीय...
निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलचा दहावीचा १००% निकाल – विद्यार्थ्यांची घवघवीत यशकथा राज्यभर गाजतेय
दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने सलग यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत १००% निकाल साध्य केला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. यंदा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५० जणांनी प्रथम श्रेणी आणि ७ जणांनी द्वितीय श्रेणी मिळवून...
“नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प
पुणे | प्रतिनिधी “नवीन कर्मभूमीला वंदन” अशा भावनिक शब्दांत काँग्रेस पक्षात प्रवेशानंतरचा पहिला अनुभव व्यक्त करत आज पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनात पहिल्यांदा अधिकृत पाऊल टाकण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कणा असलेल्या आणि देशाला दिशा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या वास्तूत प्रवेश करताना केवळ अभिमान नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापूर्वी अनेकदा काँग्रेस भवनला भेट दिली असली, तरी...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
पुण्याच्या साईलीचा ‘आयर्नमॅन’ विजय; १२.२६ तासांत पूर्ण केली आव्हानात्मक स्पर्धा.
पुण्याच्या ४१ वर्षीय साईली वाघ गंगाखेडकर यांनी आयर्नमॅन चॅलेंजमध्ये १२.२६ तासांत जबरदस्त कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या फ्रँकफर्ट आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून देशातील सर्वात जलद महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. आयर्नमॅन ट्रायथलॉन ही विश्व ट्रायथलॉन कॉर्पोरेशनद्वारे आयोजित लांब पल्ल्याची स्पर्धा आहे. फ्रँकफर्ट आयर्नमॅन स्पर्धेत ३.८ किमी जलतरण, १८०.२ किमी सायकलिंग, आणि ४२.२ किमी धावणे...








