पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा व्यवस्थापनाचा नवा अध्याय सुरू ; आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते ‘नवी दिशा – शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पाचे’ भूमिपूजन संपन्न!
पिंपरी-चिंचवड : शहरातील दत्तनगर येथे पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा नवा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या 'नवी दिशा - शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प' या पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्याच महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार श्री. अमित गोरखे यांच्या हस्ते गुरूवारी, 06 ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहीवातावरणात पार पडला. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये शहरातील पहिला प्रकल्प:...
सहकारी बँकिंग क्षेत्राला डिजिटल सुरक्षेचे कवच; अत्याधुनिक एसओसीसह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ
सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सायबर सुरक्षा, डिजिटल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित व सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध अत्याधुनिक डिजिटल सेवांचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या डिजिटल सेवांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरी सहकारी बँकांना बदलत्या डिजिटल युगातील सायबर धोके,...
सांगवी विभागाला मिळाले नवे ACP कार्यालय; नागरिकांना अधिक तत्पर आणि पारदर्शक पोलीस सेवा मिळणार
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांगवी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) फीत कापून आणि फलकाचे अनावरण करून करण्यात आले. सांगवी विभागातील वाढते कामकाज, नागरिकांच्या तक्रारी आणि पोलीस प्रशासनाशी...
राजू मिसाळ : जनतेच्या विश्वासाचा चेहरा, माणुसकी जपणारे आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारे नेतृत्व!
पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारे माजी उपमहापौर तथा चार वेळा नगरसेवक राहिलेले राजू मिसाळ हे सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे संबंध जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. राजकारणात अनेक वर्षे सक्रिय राहून विविध पदांवर जबाबदारी सांभाळताना त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांशी सातत्याने संवाद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेताना जनतेशी निर्माण झालेले...
KSB लिमिटेडची दमदार कामगिरी; Q2 मध्ये ₹690.70 कोटीची विक्री
पिंपरी : पंप, व्हॉल्व्ह आणि सिस्टीम्स क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी KSB लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2) सातत्यपूर्ण व्यवसायात वाढ नोंदवली आहे. कंपनीची विक्री ₹690.70 कोटी इतकी झाली असून विविध औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळाल्याने आगामी काळातील व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या तिमाहीत कंपनीला गदरवारा ऊर्जा प्रकल्पासाठी पहिली LUV पंप ऑर्डर, कैगा अणुऊर्जा प्रकल्पासाठी...
महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न’ नावाने झालेल्या ‘साहित्यरत्न दौड २०२६ मध्ये’ हजारो युवा एकत्र धावले, नागरिक- पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;
लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात अत्यंत दणक्यात, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ पार पडली. उल्लेखनीय म्हणजे साहित्यरत्न दौडमध्ये नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून २२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय...
‘चार प्रकारांत कचरा विलगीकरण करा’; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन, जनजागृती अभियानाला वेग
पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभर कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी घरातून निर्माण होणारा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांमध्ये कचरा वेगळा करून महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महापालिकेचे कर्मचारी विविध प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे...
RTO शेजारील बांधकामामुळे रस्त्यावर चिखल; निसरड्या रस्त्यावर अनेक नागरिक घसरले, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
पुणे : RTO कार्यालयाशेजारी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील डंपर रस्त्यावर येताना मोठ्या प्रमाणात चिखल मुख्य रस्त्यावर आणत असल्याने परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे. सोमवारी सकाळी अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी घसरून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने ही त्यांची नियमित जबाबदारी नसतानाही तत्परता दाखवत सकाळी रस्ता धुवून स्वच्छ केला....
पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग पॉलिसीला वेग; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी
पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला असून भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात...
पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा रोडमॅप तयार; प्रारूप विकास आराखडा २०२६ वर नागरिकांनी नोंदवा हरकती आणि सूचना
पिंपरी, दि. ३ ऑगस्ट २०२६ :पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २० वर्षांचा विकास अधिक नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवून सुनावणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम विकास आराखडा अधिक प्रभावी व सर्वसमावेशक करण्यात येणार आहे. महापालिकेने...





