राजकीय

Home राजकीय Page 2

कुदळवाडी-चिखली परिसरातील मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शत्रुघ्न काटेंनी केली सामाजिक कार्याची प्रशंसा!

0

कुदळवाडी आणि चिखली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत घेतला. समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विशेष कौतुक केले आणि आयोजक दिनेश यादव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजासाठी आरोग्याचा मोठा उपक्रम या शिबिरात सामान्य सर्दी-खोकल्यापासून ते हृदयरोग,...

सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

पुणे : राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणी पुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणार्या धरणांच्या जलाशयांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प ('फ्लोटिंग सोलर') उभारून महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रस्थानी आणण्याचा विश्वास  जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. जलसंपदा...

पुणे–सोलापूर महामार्गावर भव्य स्वच्छता मोहीम; सुमारे १.५ टन कचरा संकलन

0

पुणे शहर आणि उपनगर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, इंदिरा एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग कॉलेज, जनवाणी संस्था, स्वच्छ संस्था आणि ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे–सोलापूर महामार्गावर भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बुधवार, सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र ते मोरे वस्ती राम मंदिर, रोहित वडेवाले साईट या पट्ट्यात ही मोहीम पार...

पुण्यात खंडणी विरोधी पथकाची कारवाई; निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी गांजासह जेरबंद

0

पुणे: पुणे शहरातील खंडणी विरोधी पथक - २, गुन्हे शाखा ने एका महत्वाच्या कारवाईत निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी मुसाब इलाही शेख (वय ३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) गांजासह जेरबंद केला आहे. ही कारवाई दि.१५/१०/२०२५ रोजी शहरातील सार्वजनिक रोडवर रात्र्रीत पोलीस पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव आणि पोलीस अंमलदार अमोल घावटे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा गौरव – भाजपाच्या ‘संविधान गौरव अभियान’मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे महत्त्वपूर्ण विधान

0

पुणे: भारताचे संविधान हे जनतेसाठी प्रेरणा आणि संरक्षणाचा स्त्रोत आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित 'संविधान गौरव अभियान' सभेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आणि संविधानाचा सन्मान कायम राखण्याचे काम भाजपाने गेल्या दहा वर्षांत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संविधानाचा सन्मान आणि भाजपाची भूमिका “डॉ. बाबासाहेब...

पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 मुळे शाळांना अर्धदिवस सुट्टी – 23 जानेवारीला दुपारी 12 नंतर पुणे मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद

0

पुणे (दि. 21): पुणे ग्रँड चॅलेंज टूर–2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांसाठी विशेष आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, 23 जानेवारी रोजी सर्व शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि त्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येतील. या स्पर्धेचा चौथा...

पुणे मनपा हद्दीतील २३ गावांसाठी मुंबईत विशेष बैठक; विकास निधी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वसुली व कर्मचारी पुर्नसेवेवर महत्त्वाचे निर्णय

0

 पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे, कर्मचारी समस्या आणि आर्थिक नियोजनासंबंधी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने पुणेकर नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. विकासासाठी आर्थिक पाठबळ – फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नवीन नगर परिषदेच्या...

पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे

0

नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...

मुंबईत ‘जागतिक महिला दिन २०२६’ उत्साहात साजरा; महिला सन्मान पोर्टलचे अनावरण, सायबर वेलनेस कक्षाचे उद्घाटन

0

मुंबई, प्रभादेवी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रभादेवी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला उद्योजिका, तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. उपस्थितांना...

स्वच्छ पिंपरी-चिंचवडकडे आणखी एक पाऊल! काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची पाहणी; वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनावर भर

0

पिंपरी-चिंचवड | दि. २३ जुलै २०२६ : "स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य" या ध्येयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला प्रत्यक्ष भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि...

Copyright ©