सामाजिक

Home सामाजिक Page 63

दरे येथील श्री क्षेत्र उत्तेश्वर यात्रेला भक्तीचा महासागर; ग्रामदैवताच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय

0

दरे, #सातारा | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री क्षेत्र उत्तेश्वराच्या वार्षिक यात्रेला मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली. या पवित्र यात्रेनिमित्त उपस्थित राहून श्री उत्तेश्वराचे सहकुटुंब विधिवत पूजन करत मनोभावे दर्शन घेण्यात आले. या यात्रेदरम्यान संपूर्ण दरे गाव भक्तीरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी...

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

सातारा : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि...

युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी

0

पुणे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्यादृष्टीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 सा कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे आयोजित  सन 2025-26 या वर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह निगडी येथे 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या पारितोषक वितरण समारंभासाठी  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी,  उपसंचालक माणिक पाटील,  उपसंचालक युवराज नाईक,  सहायक संचालक मिलिंद...

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन...

मालाड वॉर्ड क्र. ५० मध्ये तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन; आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

0

मुंबई : आज मालाड येथील वॉर्ड क्रमांक ५० मधील उमेदवार तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण...

कुलाबा–मुंबादेवीत महायुती उमेदवारांना पाठिंबा; विजयी होऊन जनसेवेत आघाडीवर राहतील – विश्वास व्यक्त

0

मुंबई : आज कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान वॉर्ड क्रमांक २२६ मधील आमदार राहुल नार्वेकर जी आणि मकरंद नार्वेकर जी, तसेच वॉर्ड क्रमांक २२३ मधील रुपेश पाटील जी यांना निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीत स्थानिक विकास, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक तसेच नागरी सोयी-सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीचे उमेदवार...

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या विविध कार्यालयास भेट

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणूक संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी आज महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनास भेट दिली तसेच विविध कक्षांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांना अभिरक्षा कक्ष, प्रस्तावित मतमोजणी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच नामनिर्देशन...

‘हा शब्द ठाकरेंचा!’ – महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांशी थेट संवाद, मुंबईच्या भविष्यासाठी आराखडा सादर

0

मुंबई : “हा शब्द ठाकरेंचा…!” असे ठामपणे सांगत आज आदित्य ठाकरे आणि मी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांशी सविस्तर संवाद साधला. हा संवाद केवळ निवडणुकीच्या तयारीपुरता मर्यादित नव्हता, तर मुंबईकरांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ठोस आराखड्याचे सादरीकरण होते. या बैठकीत मुंबईच्या विकासाचे व्हिजन, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षआणिण  स्थानिक स्वराज्य...

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात कडक कारवाई; 240 वाहनचालकांवर कारवाई

0

पुणे :- वर्षअखेर आणि नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. मात्र, या कालावधीत काही बेजबाबदार वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याने स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात विशेष आणि कडक मोहिम...

२०२६ कडे वाटचाल : फूड ट्रकपासून हेल्दी मेन्यूपर्यंत पुण्याचं बदलतं खाद्यविश्व; परवडणारी किंमत ठरणार निर्णायक

0

पुणे : शिक्षण, आयटी आणि संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचं खाद्यविश्वही झपाट्याने बदलत आहे. २०२६ कडे पाहताना पुण्यातील फूड सीन अधिक व्यापक, वैविध्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. आज फूड ट्रक हे केवळ एखाद्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, दैनंदिन जेवणाचा अविभाज्य भाग बनत चालले आहेत. पौड रोड, बाणेर आणि विमाननगरसारख्या भागांमध्ये आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत संध्याकाळी रस्त्यांवर उभे...

Copyright ©