सामाजिक

Home सामाजिक Page 61

देशातील विद्युत चाचणी क्षमता अधिक मजबूत होणार; CPRI च्या महत्त्वपूर्ण बैठकीत सखोल आढावा

0

नवी दिल्ली : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान (CPRI) यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविताना केंद्रीय ऊर्जा मंत्री मा.ना. श्री. मनोहर लाल यांनी संस्थेच्या चाचणी (टेस्टिंग) सुविधांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यावर सविस्तर व व्यापक आढावा घेतला. ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन CPRI च्या परीक्षण क्षमतेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीदरम्यान, उच्च क्षमतेच्या विद्युत...

बीएमसी निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईत भव्य रोड शो

0

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, याच अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत भव्य रोड शो काढला. या रोड शोला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हा रोड शो मध्य मुंबईतील प्रमुख भागांतून मार्गक्रमण करत पार पडला. ठिकठिकाणी...

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : वॉर्ड ११२ मध्ये महायुतीच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या समर्थनार्थ नागरिकांशी संवाद

0

मुंबई | भांडुप पश्चिम : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भांडुप पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ११२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार साक्षी दळवी यांच्या समर्थनार्थ ड्रीम्स सोसायटी येथे स्थानिक रहिवाशांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. या संवाद...

प्रभाग क्रमांक २८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद; पिंपरी-चिंचवडच्या भवितव्यावर निर्णायक निवडणूक – उमेश काटे

0

पिंपरी-चिंचवड : येऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश गणेश काटे, श्रीम. शीतल विठ्ठल काटे, श्रीम. मीनाक्षी अनिल काटे आणि श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी उमेदवारांनी सांगितले...

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : शिवसेना-भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

0

कल्याण-डोंबिवली : येऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभा कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही ठिकाणी पार पडणार असून, महायुतीच्या प्रचाराला यामुळे मोठी ऊर्जा मिळणार आहे. या सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर, राज्य सरकारच्या लोकाभिमुख...

प्रभाग क्र. १९२ मध्ये शिवसेनेची ताकद वाढली; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाला सदिच्छा भेट

0

आज प्रभाग क्रमांक १९२ मधील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराशी सविस्तर संवाद साधत आगामी निवडणूक ताकदीने, सकारात्मक विचारांनी आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित राहून लढण्याच्या शुभेच्छा दिल्या. स्थानिक विकास, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, तसेच प्रभागाच्या...

मुंबईत संगीत व मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा; युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप–एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यात धोरणात्मक भागीदारी

0

मुंबई : महाराष्ट्राला जागतिक मनोरंजन नकाशावर आणखी भक्कम स्थान मिळवून देणारी महत्त्वाची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (UMG) आणि भारतातील नामांकित फिल्म व कंटेंट निर्मिती संस्था एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यात धोरणात्मक भागीदारी करार जाहीर करण्यात आला. या भागीदारीमुळे भारतीय संगीत, चित्रपट, डिजिटल कंटेंट आणि जागतिक वितरणाच्या क्षेत्रात...

हडपसर काळेपडळ येथे प्रचारादरम्यान शिवसेना नेत्यांच्या वाहनावर दगडफेक; उमेदवार सारिका पवार गंभीर जखमी

0

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकीय वातावरण तापत असतानाच हडपसर परिसरातील काळेपडळ येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या वाहनावर प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाना...

महापालिका निवडणुकीपूर्वी पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ‘बचक्या’ टोळीतील कुख्यात सराईत आरोपी जेरबंद

0

पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेकडून जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ ने दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला ‘बचक्या’ टोळीतील कुख्यात सराईत आरोपी राजेश उर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९) याला अटक करून मोठे यश मिळवले आहे. दिनांक ११ डिसेंबर २०२५...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे...

Copyright ©