पुण्यात दुचाकी चोरी व घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद!
पुणे शहराच्या विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ गुन्ह्यांचा पर्दाफाश करत आरोपीकडून सुमारे २.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा घटनाक्रम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे २ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत पुण्यातील शनिपार पेठ येथील रेबल फूड, क्लाऊड किचन समोर फिर्यादीने त्यांची बजाज कंपनीची...
“तळेगाव-शिक्रापूर रस्त्याच्या विकासाला गती; अजित पवारांची मोठी घोषणा, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश”
मावळ, ता. ११ मार्च: मावळ, खेड आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांचा वाहतुकीसंदर्भातील मोठा प्रश्न असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विकासासाठी अखेर सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. १०) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना या महामार्गाबाबत मोठी घोषणा केली. तळेगाव-शिक्रापूर रस्त्यासाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात अजित पवार यांनी पुणे ते शिरूर या ५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी तब्बल ७,५१५ कोटी...
भारतीय क्रिकेट संघाचे आयसीसी चॅम्पियन्स चषक विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कौतुक
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला असून हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाच्या शानदार कामगिरीचे विशेष कौतुक करताना ही ऐतिहासिक विजयगाथा क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले. १२ वर्षांनी भारताचे चषकावर पुनरागमन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, तब्बल १२ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा आयसीसी...
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पुढचे पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर गौरवोद्गार
मुंबई:- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करण्यासाठी सादर झालेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असून, तो राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प आधारित असून, हे पाच घटक राज्याच्या समृद्धीला गती देणार आहेत. महाराष्ट्राचा...
पुणे कॉमिक कॉन २०२५ ने चाहत्यांना दिल्या अविस्मरणीय आठवणी – कॉमिक्स चाहत्यांना मिळाली ब्लॉकबस्टर वीकेंडची पर्वणी
पुणे, १० मार्च:- क्रंची रोलच्या सौजन्याने आयोजित मारुती सुझुकी अरीना पुणे कॉमिक कॉन २०२५ ने पुणेकरांना या वर्षातील सर्वोत्तम ब्लॉकबस्टर वीकेंडची पर्वणी दिली आहे. अविस्मरणीय आठवणींसह हा कार्यक्रम संपूर्ण शहराला पॉप कल्चरच्या भव्य उत्सवात न्हाऊन काढणारा ठरला. पुण्यासह विविध भागांतून आलेल्या चाहत्यांना या दोन दिवसीय उत्सवाने नॉन-स्टॉप मनोरंजनासह, खास चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि इंडस्ट्रीतील नामांकित ब्रँड्सच्या आकर्षक अनुभवांसाठी...
पिंपरी, १० मार्च २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८० तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत...
हडपसरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक!
पुणे | हडपसर | १० मार्च २०२५:- हडपसर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा वाढता धोका लक्षात घेता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि धक्कादायक कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. 🔹 औषधांचा गैरवापर वाढता धोका – युवा पिढीला गंडा 🔸 उच्च किंमतीमुळे अवैध नशिले पदार्थ खरेदी करण्यापेक्षा अनेक तरुण सोप्या मार्गाने औषधांच्या सेवनाकडे वळत आहेत.🔸 या प्रकरणात अटक...
पिंपरी न्यायालयाचा ३६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – महिला दिनाचाही सोहळा दिमाखात पार!
पिंपरी-चिंचवड :- पिंपरी न्यायालयाच्या स्थापनेला ३६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्धापन दिन आणि महिला दिनाचा भव्य सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🔹 न्यायालयाचा प्रवास – संघर्ष ते यशस्वी वाटचाल! 🔹 १९८९ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे पहिले न्यायालय सुरू झाले आणि आज शहरात...
पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा!
पुणे: महिलांच्या संघर्षाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुणे काँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख व मोरया प्रतिष्ठानचे प्रमुख श्रीयुत राजेंद्र पुंडलिक मोरे यांच्या वतीने जागतिक महिला दिन 2025 निमित्ताने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कर्तृत्वाचा सन्मान, समाजसेवेला मान्यता! या कार्यक्रमात कसबा संस्कार केंद्र आणि...
आयआयएम नागपूरमध्ये ऊर्जा व क्रीडा क्षेत्रातील मोठी झेप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2MW सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी आणि गोल्फ अकॅडमीचे उदघाटन!
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयआयएम नागपूर येथे 2 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी तसेच अत्याधुनिक गोल्फ अकॅडमी आणि लर्निंग सेंटरचे भव्य उदघाटन करण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे नागपूरच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सौरऊर्जा प्रकल्पामुळे स्वच्छ ऊर्जेचा विस्तार ▶ आयआयएम नागपूरमध्ये उभारला जाणारा 2 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प परिसराला...














