महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 9

ठाण्यात मोठा अनर्थ टळला! घोडबंदर उड्डाणपुलावर १२ टन गुळाने भरलेला ट्रक कठडा तोडून कडेला लटकला; वाहतूक ठप्प

0

ठाणे : ठाण्यातील गजबजलेल्या घोडबंदर मार्गावर शुक्रवारी पहाटे अत्यंत थरारक आणि धक्कादायक अपघात घडला. १२ टन वजनाचा गूळ वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालकावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि उड्डाणपुलाच्या कडेला धोकादायकरीत्या लटकून राहिला. काही क्षणांसाठी घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वाहनचालकांचा श्वास रोखला गेला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही आणि मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास...

देहूतील इंद्रायणी घाटाचा होणार कायापालट! वारकऱ्यांच्या सेवेसाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना वेग; आषाढी वारीपूर्वी सुविधा अधिक सक्षम

0

देहू : आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची पावन भूमी असलेल्या देहू नगरीतील इंद्रायणी घाटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. वारकरी, भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल १३.०८ कोटी रुपयांच्या विकासकामांना युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे इंद्रायणी नदी घाट परिसराचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून संतभूमीच्या...

‘हरित क्रांतीचे जनक’ वसंतराव नाईक यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभिवादन; विकासाभिमुख विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प

0

पिंपरी | प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळख असलेले दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग अकरा वर्षे विराजमान...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विक्रमी ‘माईलस्टोन’! अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटींची मालमत्ता कर वसुली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत इतिहास घडवत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले असून, महापालिकेच्या इतिहासातील ही पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरत विविध सवलतींचा लाभ...

आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लिखित उत्तर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केली महत्त्वपूर्ण घोषणा

0

मुंबई, दिनांक 25 जून 2026: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री मा. नामदार योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत...

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

पिंपरी, दि. २५ जून २०२६ | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले आणि नगरी विकासाचा भक्कम पाया रचणारे पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी...

मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून खून! प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसून हत्या; आरोपी रोशन सुवर्णा ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबईच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून आरोपी रोशन रमेश सुवर्णा याला बोरीवली न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची...

चेतन-केतन प्रकरणात नवा ट्विस्ट! तिसऱ्या तरुणाची एन्ट्री; मोबाईल फोनमुळे वाढला संशय, सिया गोयलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

0

पुणे | प्रतिनिधी पुण्यातील लोहगड मृत्यू प्रकरणाने दिवसेंदिवस अधिकच गंभीर वळण घेतले असून आता या प्रकरणात आणखी एका तरुणाची एन्ट्री झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. केतन अग्रवालच्या मृत्यूमागे कट रचल्याच्या आरोपावरून त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता नीरज कुमार नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणात...

केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी देशभरातून संताप; अभिनेत्री आंचल खुरानाचे तीव्र वक्तव्य, ‘या पिढीला नक्की काय झालंय?’

0

पुण्यातील उद्योगपती कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेने तपासादरम्यान धक्कादायक वळण घेतले असून, या प्रकरणातील आरोप आणि उघड होत असलेल्या माहितीमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या २६ वर्षीय केतन अग्रवाल यांचा दरीत...

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले; अंधेरी सबवे जलमय, वाहतुकीचा खोळंबा

0

मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर अवघ्या एका दिवसात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अंधेरी सबवे परिसर पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे परिसरात...

Copyright ©