महाराष्ट्र
पुणे–पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती! ई-आरटीएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पिंपरी, दि. २८ जुलै २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’ आणि महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन….
पिंपरी, दि. २८ जुलै :- "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ यंदापासून सात दिवस विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. प्रथमच आयोजित करण्यात येणारी 'साहित्यरत्न दौड' ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी आणि सामाजिक एकतेचा...
पुणे जिल्हा परिषदेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप, परिसरात खळबळ
पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषद परिसरात सोमवारी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा कथित प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेत महिला भाजल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला...
मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सॅटेलाईट फोनचे वितरण
मुंबई | प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामानातील बदल आणि सुरक्षा सूचना वेळेत प्राप्त व्हाव्यात तसेच मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम समुद्री भागातही संपर्क कायम राहावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. समुद्रातील मच्छिमारांची...
सायना नेहवाल यांनी छत्रभुज नरसी स्कूल, पुणे येथे सुजय जयराज यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’ म्हणजेच दिलखुलास संवाद साधला
पुणे,– छत्रभुज नरसी स्कूलच्या Champion Connect 'चॅम्पियन कनेक्ट' या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ज्याअंतर्गत शाळा आपल्या समुदायासाठी विविध क्षेत्रांतील यशस्वी नेते आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना अर्थपूर्ण संवादासाठी आमंत्रित करते, अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसीस्कूलमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या आणि माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल (World No. 1) बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासोबत प्रेरणादायी फायरसाइड कन्व्हर्सेशन आयोजित करण्यात आला. +या संवादाला आणखी एक भावनिक आणि वैयक्तिक पैलू लाभला तो म्हणजे श्री. सुजय...
कठीण परिस्थितीवर मात करत UPSC मध्ये १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
पिंपरी-चिंचवड, २५ जून २०२६ : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कै. गणपत गोरखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ च्या वतीने आयोजित 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६' अत्यंत दिमाखात पार पडला. बुधवार, दिनांक २२ जून रोजी नोवेल स्कूल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत...
डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
पिंपरी(प्रतिनिधी) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे(दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा "शिक्षणमहर्षी" या सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, भाजपचे...
स्वच्छता, आरोग्य, क्रीडा व पायाभूत सुविधांसह स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची विविध विषयांना मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापालिका सभेत शहरातील क्रीडा सुविधा, स्वच्छता, आरोग्य, जलनिःसारण, सार्वजनिक सुविधा, माहिती-तंत्रज्ञान, स्मशानभूमी, रुग्णालय विकास तसेच विविध पायाभूत विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देणे, सुरू असलेल्या विकासकामांना गती देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये सातत्य राखणे या उद्देशाने विविध विषय सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आले. सभेत मासुळकर कॉलनी येथील महापालिकेची व्यायामशाळा...
स्वच्छ पिंपरी-चिंचवडकडे आणखी एक पाऊल! काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची पाहणी; वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनावर भर
पिंपरी-चिंचवड | दि. २३ जुलै २०२६ : "स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य" या ध्येयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला प्रत्यक्ष भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली SDGs इंडिया इंडेक्सचा आढावा
मुंबई | प्रतिनिधी : राज्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals - SDGs) इंडिया इंडेक्समधील महाराष्ट्राच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेणारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रगती, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता, तसेच भविष्यातील कृती...





