महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 211

“मिशन परिवर्तन” उपक्रमाने बालकांना दिला स्वावलंबनाचा नवा मार्ग

0

पुणे, दि. २५: पुणे पोलिस आयुक्तालयाच्या "मिशन परिवर्तन - नवी दिशा, नवा प्रवास" या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात आठ विधी संघर्षग्रस्त बालकांना स्वावलंबनाचा नवीन मार्ग दाखवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत बालकांना जूट बॅग निर्मितीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान बालकांनी आपल्या हाताने जूट बॅग तयार करत उत्कृष्ट कौशल्य दाखवले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. उपक्रमाचे...

महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली मतदानाची शपथ…

0

पिंपरी, दि. २५ जानेवारी २०२५ :- ‘’आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’ अशी शपथ अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय...

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना श्रद्धांजली: महाराष्ट्राने गमावला एक चिंतनशील साहित्यिक

0

मुंबई, दि. २५: महाराष्ट्राच्या वैचारिक आणि साहित्यिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने राज्याने एक विचारवंत आणि साहित्यिक स्तंभ गमावला आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, वैचारिक, आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शोकसंदेशाद्वारे केले आहे. न्या. चपळगावकर यांचे कर्तृत्व आणि योगदान अविस्मरणीय आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि हैद्राबाद...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पिंपरी, शगुन चौक: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अभिवादन कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन होणे. कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम...

कर्वेनगर परिसरात वृद्ध महिलेला धक्का; ४०,००० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले

0

पुण्यातील कर्वेनगर परिसरात ८३ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४०,००० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या घटनेने पुणे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीसांनी तत्काळ या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. घटनेची वेळ आणि ठिकाण: घटना दि. २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी...

कुख्यात गुंड सोन्या घायाळ आणि साथीदारांच्या मुसक्या आवळल्या; लोणी काळभोर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

0

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने मोकोका गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आले असून, ही कामगिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमता आणि चिकाटीचे प्रतीक ठरली आहे. कुख्यात गुंड सोन्या ऊर्फ निखील घायाळ आणि त्याच्या टोळीने केलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी अथक प्रयत्नांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून नागरिकांना दिलासा दिला आहे. दि. २३ डिसेंबर २०२४: कुख्यात...

सराईत वाहन चोराकडून एकूण ०६ मोटार सायकल जप्त करण्यात आले यश.

0

खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत वाढते वाहन चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीकोनातुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. अनिल सुरवसे, प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार...

महिला अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे प्रशिक्षण..

0

पिंपरी, दि.२3 जानेवारी २०२५ – कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ...

पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी मार्शल’ पथकाची प्रभावी कामगिरी

0

पुणे, २३ जानेवारी २०२५ : पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'दामिनी मार्शल' पथकाने आपल्या कार्यक्षमतेने महिलांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. २०१५ साली पुणे पोलिसांनी या पथकाची स्थापना केली होती, ज्यामध्ये केवळ महिला पोलिसांचा समावेश आहे. या पथकाचे उद्दिष्ट महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहणे आणि त्यांना मदत करणे आहे。 २०२३ साली, शहरातील महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, दामिनी पथकांच्या संख्येत...

बिबवेवाडीत बिअर बारमध्ये वाद, मित्रावर जीवघेणा हल्ला!

0

पुणे, बिबवेवाडी – बिबवेवाडी येथील एस.के. बार, स्वामी विवेकानंद रोड येथे २१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री १२:०१ ते १२:४५ दरम्यान एका तरुणावर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय व्यक्तीने आपल्या मित्रांसोबत बिअर पित असताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तक्रारदार आणि त्याचा मित्र असे नमूद इसमांसोबत बसले असताना, बिल देण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. या वादात...

Copyright ©