महाराष्ट्र
झोपेत असलेल्या मित्रांच्या घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला हडपसर पोलिसांची शिताफीने अटक!
पुणे – हडपसर परिसरातील मांजरी येथे उघड्या दरवाजाचा फायदा घेत तीन मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुण चोरट्याला हडपसर पोलीसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. ही घटना २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते २३ एप्रिल सकाळी ६ वाजेच्या दरम्यान जाई रेसीडन्सी, मांजरी, पुणे येथे घडली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र प्लॅटमध्ये दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपले होते. या संधीचा फायदा घेत...
समृद्ध कलेचा साक्षात्कार! त्रिशुंड गणेश मंदिरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग अकॅडमीचा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार
पुणे, सोमवार पेठ – भारताचा हजारो वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नृत्यकलेची परंपरा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आणि अभिजात सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात पार पडला. सुमारे 300 वर्षे जुन्या आणि ऐतिहासिक वास्तू असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर करत नटरंग अकॅडमीच्या युवा कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्ट...
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जनतेमध्ये रुजल्यास प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा' संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यवस्थेने, सरकारने किंवा अधिकाऱ्याने नागरिकांचे अधिकार मानले नाहीत तर नागरिकांना दाद मागण्यासाठी या अधिकारांना अधिनियमाद्वारे बांधले पाहिजे. आमदार असताना मी यासंबंधीची...
खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे : पुणे शहरात खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, गणेश आप्पा मकवाने, वय २४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, ओम साई जिम शेजारी, वडगाव बु, सिंहगडरोड पुणे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे आणि तो...
देशातील गतिमान आरोग्य सेवा जगभरात गाजली; छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम युनिटचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : देशातील आरोग्य क्षेत्राने जगभरात आपल्या प्रगतीचा ठसा उमठवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, देशात उपचार सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून कर्करोगावर विशेष भर देण्यात आला आहे. चालू वर्षात लवकर निदान झालेल्या ९० टक्के कर्करोग रुग्णांवर ३० दिवसांच्या आत उपचार सुरू करण्यात आले आहेत. या गतिमान कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे,...
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण : तिसऱ्या आरोपीला २ मेपर्यंत पोलिस कोठडी; तपासात नवे धक्कादायक तपशील उघड
पुणे : बोपदेव घाट परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी, बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (३३, रा. काटेवाडी, बारामती) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून अटक करून पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर शनिवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्यात त्याला अटक करण्यात आली. तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी:रविवारी पुण्यातील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात...
पुण्यात उन्हाचा कहर! लोहगावमध्ये ४२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद; राज्यातील सर्वाधिक उष्णतेची नोंद
पुणे : पुणे शहरातील लोहगाव परिसराने रविवारी उन्हाच्या तीव्र झळा सहन करत, ४२.८ अंश सेल्सियस इतक्या उच्च तापमानाची नोंद केली. ही तापमानाची नोंद संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक असून, सध्या सामान्य तापमानाच्या तुलनेत ४.१ अंशांनी जास्त आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात पुढील काही दिवसही उष्म्याची लाट कायम:भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ३० एप्रिल पर्यंत पुण्यात तापमान...
मुंबईत भीषण अपघात : फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा BEST बसखाली येऊन मृत्यू
मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सार्थक जंगम या युवकाचा BEST बसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब मराठे रोडवर ही दुर्घटना घडली. सार्थक जंगम, वय २१, वांद्रे (पश्चिम) येथील सहकारी भंडार येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अपघाताच्या वेळी तो एका डिलिव्हरी कॉलवर जात असताना दुर्दैवीरित्या...
जम्मू कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या सामानाची बांधाबांध, पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली माहिती
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी कडक पावले उचलली आहेत. या हल्ल्यात 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यात राज्यातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देऊन अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पर्यंत हा बॉर्डर बंद राहील. पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती पुण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र...
आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांमुळे श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परतले
पिंपरी-चिंचवड | २६ एप्रिल २०२५ :- पिंपरी-चिंचवडमधील एकाच कुटुंबातील १४ जण श्रीनगरमध्ये अडकले होते, मात्र पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांनी सुखरूपपणे परत पुणे पोहोचले. श्रीनगरमधील स्थानिक परिस्थिती आणि तिकीटांच्या अडचणीमुळे या कुटुंबाला परत जाणे कठीण होतं. पण आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने ते सर्व श्रीनगर ते पुणे हवाई मार्गाने परत येऊ शकले. संकटात असलेल्या प्रवाशांना मदत या...











