Breaking News

Home Breaking News Page 318

डोंबिवलीतील अनमोलनगरी परिसरात आठवडी बाजारावर पालिकेची कारवाई; बंदीच्या सूचनांनंतरही पुन्हा बाजार भरल्याने फेरीवाला हटाव पथक सक्रिय

0

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा परिसरातील अनमोलनगरी गृहसंकुलाजवळ असलेल्या बाह्यवळण रस्त्यावरील (रिंगरूट) १०० फुटी रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दर गुरुवारी या रस्त्यावर फेरीवाल्यांकडून आठवडी बाजार भरविला जात असल्याचे समोर आले आहे. या बाजारामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या ह प्रभागाने कारवाई करून याठिकाणी बाजार भरवू नये, अशा...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड’ आणि महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन….

0

पिंपरी, दि. २८ जुलै :- "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ यंदापासून सात दिवस विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. प्रथमच आयोजित करण्यात येणारी 'साहित्यरत्न दौड' ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी आणि सामाजिक एकतेचा...

दुकानांसमोरील अतिक्रमण १५ दिवसात हटवा, अन्यथा कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा

0

पिंपरी, दि. २५ मे २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पदपथावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात, त्यामुळे कोणत्याही पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच काही दुकानदार आपल्या दुकानापुढे अतिक्रमण करून साहित्य ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अशा दुकानधारकांनी येत्या १५ दिवसांत असे...

पुण्यात खंडणी विरोधी पथकाची कारवाई; निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी गांजासह जेरबंद

0

पुणे: पुणे शहरातील खंडणी विरोधी पथक - २, गुन्हे शाखा ने एका महत्वाच्या कारवाईत निलेश घायवळ टोळीचा पाहिजे आरोपी मुसाब इलाही शेख (वय ३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) गांजासह जेरबंद केला आहे. ही कारवाई दि.१५/१०/२०२५ रोजी शहरातील सार्वजनिक रोडवर रात्र्रीत पोलीस पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव आणि पोलीस अंमलदार अमोल घावटे...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभिवादन

0

पिंपरी, दि. २८ मे २०२६ : महान क्रांतिकारक, साहित्यिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती,...

‘स्मृतिगंध’ स्मारकात रुजलेली प्रेरणा; सुरंगीचे झाड आजही सांगते अजितदादांच्या समाजसेवेची कहाणी

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. गोविंदराव निकम साहेब यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. Ajit Pawar यांच्या हस्ते लावण्यात आलेले सुरंगीचे झाड आज दिमाखात उभे आहे. काळाच्या ओघात वाढत गेलेले हे झाड आता त्या ऐतिहासिक क्षणाचे जिवंत स्मारक बनले आहे. उद्घाटनावेळी वृक्षारोपण करताना अजितदादांनी व्यक्त केलेली शिक्षणाविषयीची आस्था आणि समाजसेवेची...

जे.एम. रोडवर मोबाईल स्नॅचिंग करणारा आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; पुणे पोलिसांची तत्पर कारवाई

0

पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरात वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने जलद आणि प्रभावी कारवाई करत जे.एम. रोड परिसरात मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. कॅबची वाट पाहताना घडली घटना दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता, जे.एम. रोडवरील जंगली...

पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी खुलं झालं भीमाशंकर मंदिर; ऑनलाइन नोंदणी अनिवार्य, VIP दर्शन पूर्णपणे बंद

0

पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विकासकामांमुळे 9 जानेवारी 2026 पासून बंद असलेले हे मंदिर 15 जूनपासून दर्शनासाठी खुले झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने यावेळी काही कठोर नियम लागू केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात...

अभिजीत दीपके यांनी इतिहासाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा अभ्यास करूनच वक्तव्य करावे; आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही – आमदार अमित गोरखे

0

पिंपरी-चिंचवड :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तसेच भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवणे, निराधार आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह श्री. अतुलजी लिमये यांनी सीजेपी (CJP) आंदोलनासंदर्भात...

महापालिकेचा कागदी कारभार; सुवर्णदीप रेसिडेन्सीमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई फक्त व्हॉट्सॲपवरच?

0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयाचा अजब कारभार समोर आला असून, प्रत्यक्ष जागेवर कारवाई न करता केवळ वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदारांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. चिंचवड येथील 'सुवर्णदीप रेसिडेन्सी' मधील अनधिकृत आणि वाढीव बांधकाम हटवण्याऐवजी केवळ कागदोपत्री 'कारवाईचा खेळ' सुरू असल्याचा संताप तक्रारदार सुवर्णा दिलीप पाटील यांनी थेट महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला...

Copyright ©