Home Breaking News वानवडी परिसरात अल्पवयीन वाहनचोरांचा पर्दाफाश; तीन दुचाकी जप्त, पोलीसांची सतर्क कारवाई
पेट्रोलिंग सुरू असताना दोन तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार तात्काळ कारवाई करत पोलीसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. चौकशीत ही दोन्ही मुले अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. सखोल विचारपूस केली असता त्यांनी तीन चोरी केलेल्या दुचाकींबाबत कबुली दिली. यामध्ये निळ्या व काळ्या रंगाच्या अॅक्टिवा तसेच एक पांढऱ्या रंगाची दुचाकी असल्याचे समोर आले.