Home Breaking News गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहराची मोठी कामगिरी — सराईत घरफोड्या आरोपीस...

गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहराची मोठी कामगिरी — सराईत घरफोड्या आरोपीस अटक, तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

121
0
पुणे : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ६ ने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी वाघोली येथील चोखीढाणीजवळ सापळा रचून सराईत आरोपी बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे) यास अटक केली. आरोपीकडून चोरीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि विविध घरफोडी प्रकरणांतील सोन्याचे दागिने असा एकूण ₹२१,४०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले की आरोपी हा पूर्वी मोक्का गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असून, त्याच्यावर मुंढवा, येरवडा, चिखली, भोसरी एम.आय.डी.सी. आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून ५ वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिस आता त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

युनिट-६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुणे पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.