पुणे शहर पोलिसांनी पुन्हा एकदा चपळाई आणि शिताफीने महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पकडून मोठे यश मिळवले आहे. १५ ऑगस्ट रोजी सहकारनगर भागात एका महिलेला लक्ष्य करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केवळ १४ दिवसांत जेरबंद केले.
घटना
१५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री मानसी अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, ढोमकरपथ, सहकारनगर नं. ०२, लक्ष्मीनगर, पर्वती येथे दोन अज्ञात इसम मोपेड मोटारसायकलवर आले. त्यांनी पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले आणि काही क्षणांत पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी महिलेने तात्काळ तक्रार दाखल केली. त्यानुसार पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. २६०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास
तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्याकडे होती.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे आणि अमित चिव्हे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरून संशयितांची ओळख पटली.
सदर गुन्हा करणारे आरोपी म्हणजे : 1️⃣ रोहन प्रभू तुपारे, वय २०, रा. त्रिमूर्ती नगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे 2️⃣ केशव ईश्वर कुंभार, वय १८, रा. खोपडे नगर, महांगडेवाडी, पुणे या दोघांना शिताफीने पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले.
हस्तगत मुद्देमाल
त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तसेच एक मोटारसायकल असा मिळून एकूण ₹1,11,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ श्री. संभाजी कदम, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख आदींचा समावेश होता. सहकारनगरमध्ये महिलेला लुटणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात; १.११ लाखांचा मुद्देमाल परत