Home Breaking News पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह सात जण जुगार अड्ड्यावर रंगेहाथ; पोलिसांची मोठी कारवाई, २.२०...

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यासह सात जण जुगार अड्ड्यावर रंगेहाथ; पोलिसांची मोठी कारवाई, २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

126
0
पुणे शहरातील धनकवडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. जुना पत्रा कारखान्यात सुरू असलेल्या जुगार खेळामध्ये सात जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यात भाजप पदाधिकारी औदुंबर विठ्ठल कांबळे यांचाही समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोमवार संध्याकाळी सापळा रचून कारखान्यात घुसून पोलिसांनी छापा मारला.
यावेळी जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साधनसामग्री, मोबाईल फोन, आणि रोकड मिळून २ लाख २० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या सहभागामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई करताना पोलिस हवालदार शंकर कुंभार, विजय पवार, उज्ज्वल मोकाशी, मंगेश शेलार, युज्राज सूर्यवंशी, सागर आदगाले, बापू पाटोळे आणि रोहन लोढे यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदारांकडे सोपविण्यात आला आहे.