Home Breaking News विधानसभेत पुणे शहराच्या वाहतूक व अतिक्रमण प्रश्नांवर आमदार हेमंत रासने यांचा ठाम...

विधानसभेत पुणे शहराच्या वाहतूक व अतिक्रमण प्रश्नांवर आमदार हेमंत रासने यांचा ठाम आवाज! महापालिका प्रशासनावर सवालांचा भडीमार

65
0

मुंबई | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगची अराजक स्थिती आणि अनधिकृत होर्डिंग्ज या गंभीर समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत आवाज उठवत ठोस कृतीची मागणी केली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेकरांच्या जीवनाशी निगडीत या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आमदार रासने यांनी प्रशासनाला सवाल केला की, “महापालिकेचे अतिक्रमणविरोधी धोरण केवळ कागदावरच राहणार का?”

वाहतुकीचा बेसुमार त्रास, अतिक्रमणाने नागरिक हैराण

पुण्यातील टिळक रस्ता, मंडई, अप्पा बळवंत चौक, स्वारगेट, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता यासारख्या ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्ते व्यापले आहेत. फुटपाथवर माल टाकल्यामुळे पादचाऱ्यांची चालणे अशक्य झाले असून यामुळे दररोज अपघात होत आहेत.

 पार्किंगची बेसिस्त व्यवस्था – वाहतूक कोंडीला कारण

शहराच्या मध्यवर्ती भागात इन-आऊटची योग्य रचना नसलेल्या पार्किंग मुळे वाहने अनियमितपणे उभी राहतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते व अडथळा निर्माण होतो. यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याची टीका रासने यांनी केली.

 अनधिकृत होर्डिंग्जचं साम्राज्य – नियम धाब्यावर

“रस्ते आधीच अरुंद, त्यात जाहिरातदारांनी उभारलेली भलीमोठी होर्डिंग्ज म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका,” असा आरोप करत रासने यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवले.

 ‘नो एन्ट्री’चा जाहिर उल्लंघन

‘नो एन्ट्री’ वेळेतही रस्त्यावरून ट्रक, रिक्षा आणि खासगी वाहने सर्रास फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढत असून, पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 विधानसभेतील ठाम भूमिका

“शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा आहे, तरीदेखील ती निष्क्रिय आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” – हेमंत रासने यांचा थेट सवाल.

 बातमीचा मथळा:

“पुण्याचा मध्यवर्ती भाग बकाल का?” – आमदार हेमंत रासने यांचा विधानसभेत प्रशासनाला जाब!