Home Breaking News पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले ISO 9001:2015 मानांकित; नागरिकांसाठी दर्जेदार...

पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले ISO 9001:2015 मानांकित; नागरिकांसाठी दर्जेदार सेवांचा नवा अध्याय सुरू!

71
0

पुणे शहर पोलीस दलासाठी एक अभिमानास्पद क्षण… आंबेगाव पोलीस स्टेशनने “ISO 9001:2015” प्रमाणपत्र प्राप्त करून पोलीस आयुक्तालयातील पहिले मानांकित पोलीस ठाणे होण्याचा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून आज मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न झाला.

या वेळी उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या सुसूत्र व गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे कौतुक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे.

 ISO 9001:2015 नेमकं काय?

ISO 9001:2015 हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता व्यवस्थापन मानांकन असून, संस्था त्यांच्या कामकाजात प्रक्रिया, सेवा, आणि ग्राहक समाधान यामध्ये सातत्य ठेवते का हे पाहून हे प्रमाणपत्र दिले जाते. पोलीस यंत्रणेमध्ये पारदर्शकता, वेळेवर सेवा, दस्तऐवजांचे अचूक नोंदणी आणि नागरिकाभिमुख कामकाज हे या प्रमाणपत्राचे मुख्य निकष आहेत.

 
पोलीस स्टेशनमध्ये झालेले सकारात्मक बदल:

सर्व रजिस्टरे व फाईल्स अद्ययावत केल्या गेल्या आहेत.

कामकाज सुसूत्र व प्रमाणित प्रणालीद्वारे पार पाडले जात आहे.

नागरिकांना तक्रारींचे निवारण अधिक प्रभावी व तत्परतेने मिळू लागले आहे.

पोलिसांमध्ये प्रेरणा व कार्यक्षमता वाढली, ताणतणाव कमी झाला.

नागरिकांच्या अपेक्षांना अधिक योग्य प्रतिसाद मिळत असून जनसेवेचा दर्जा उंचावला आहे.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:

मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

मा. श्री. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त

मा. श्री. संजय बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग

मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २

मा. श्री. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग

मा. श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पो.स्टे.

मा. श्री. गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे)

व आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी

भविष्यासाठी दृष्टिकोन:

आंबेगाव पोलीस स्टेशनने या कामगिरीद्वारे इतर पोलीस ठाण्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. नागरिकांना योग्य वेळी, योग्य पद्धतीने सेवा देण्याच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. “जनतेची सेवा हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य” या भूमिकेतून काम करणाऱ्या आंबेगाव पोलीस ठाण्याचे हे यश एक सामाजिक विश्वासाचा प्रतीक बनले आहे.