Home Breaking News लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत...

लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत

88
0

लोणावळा  – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींची नावे अशी –

🔹 चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर, चिंचवड गाव)
🔹 धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी)
🔹 दीपक शिवाजी मेंदगे (३८, रा. पाटील आळी, कर्जत)
🔹 कैलासचंद्र धगनलाल जाट (४०, रा. वाशी)

या आरोपींकडून ४७ तोळे सोने, २ किलो चांदीच्या भांड्यांचा समावेश असलेला एकूण २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

९ जून रोजी बिना नारायण मुळे (६५, रा. राजुजी कॉलनी, जुना खंडाळा रोड, लोणावळा) यांच्या घरी चोरी झाली. त्या वेळी त्या आंबेगाव येथे मुलीकडे गेल्या होत्या. शेजाऱ्यांच्या फोनवरून त्यांना ही घटना कळली आणि त्यांनी तक्रार दाखल केली.

CCTV आणि बातमीदारांनी उघड केला तपासाचा मार्ग

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी रेल्वेने पिंपरी-चिंचवडकडे गेल्याचे निदर्शनास आले. गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने पोलिसांनी चंदू मानेला ओळखले आणि सापळा रचून त्याला व धनंजय काळेला अटक केली. त्यांच्याकडून पुढे माहिती मिळाल्यानंतर दीपक मेंदगे व कैलासचंद्र जाट यांनाही अटक करण्यात आली.

चंदू माने – ५० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा आरोपी!

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू माने हा पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, चेन्नई आणि कर्नाटकमध्ये ५० पेक्षा अधिक घरफोडी गुन्ह्यांमध्ये सामील आहे. तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांबरोबर चोरी करत असे आणि अवघ्या १५ दिवसांपूर्वीच चेन्नईतील गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला होता.

कारवाईचे नेतृत्व करणारे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
त्यात पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. राजेश रामाघरे, पोसई अभिजीत सावंत, सपोनि राहूल लाड, पो.अं. संदिप मानकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

पोलीसांची जलद आणि अचूक कारवाई! गुन्हेगार जेरबंद, नागरिकांत समाधान

➡️ ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
➡️ ४ सराईत आरोपींना अटक
➡️ ५० पेक्षा जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमी
➡️ पोलीस गुप्त बातमीदार आणि CCTV तपासाद्वारे कामगिरी
➡️ नागरिकांनी पोलीस कार्यक्षमतेचे केले कौतुक