पुणे : लष्करी अधिकाऱ्याची बनवाबनवी करत पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात सळसळत फिरणाऱ्या एका तरुणाला लष्कर व पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सदर तरुण लष्करी गणवेशात वावरत असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे – अभिषेक शिवाजी भोसले
अटकेची कारवाई :
ही कारवाई पुण्याच्या बिशप स्कूलजवळ दुपारी २ वाजता करण्यात आली. साऊथर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स, मिलिटरी पोलिस युनिट आणि पुणे शहराच्या लष्कर पोलिस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. विश्वसनीय गुप्त माहितीनंतर ही झडप टाकण्यात आली.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू :
दोन लष्करी गणवेश सेट
एक जोडी डीएमएस बूट
हिरवा बेल्ट
‘अभी भोसले’ नावाची बनावट नेमप्लेट
बनावट आर्मी ओळखपत्र
दोन लष्करी टी-शर्ट
एक पीक कॅप
एक कॉम्बॅट कॅप
एक मफलर (स्कार्फ) आणि इतर लष्करी साहित्य
कायदेशीर कारवाई :
अभिषेक शिवाजी भोसले याच्यावर भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) च्या कलम १६८ अंतर्गत लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कलम सरकारी पदावर बनवाबनवी करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करण्याची तरतूद करते.
सखोल तपास सुरु :
सध्या आरोपी अभिषेक भोसले याची लष्कर व पोलिस पथक संयुक्तरित्या चौकशी करत आहेत. त्याचे उद्दिष्ट काय होते? त्याने कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश केला का? इतर कोणासोबत त्याचे संबंध होते का? यावर तपास सुरु आहे. प्राथमिक चौकशीत त्याने स्वतःला “अॅक्टिव्ह आर्मी ऑफिसर” असल्याचे सांगून लष्कर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही गोंधळात टाकले होते.
घटनेचे महत्वाचे मुद्दे :
बनावट लष्करी वेशात फिरणारा तरुण अडकला
पोलिस आणि लष्कराची संयुक्त गुप्त माहितीवरून कारवाई
लष्करी साहित्य, गणवेश व बनावट ID जप्त
भीतीदायक बाब म्हणजे त्याचा पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात वावर