Home Breaking News तांब्याच्या तारांची मोठी चोरी उघडकीस, वाघोली पोलिसांचे कारनामे; २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,...

तांब्याच्या तारांची मोठी चोरी उघडकीस, वाघोली पोलिसांचे कारनामे; २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, मुंबईतील तीन सराईत चोर जेरबंद

162
0

पुणे (वाघोली) : वाघोली येथील औद्योगिक गोडाऊन फोडून तब्बल २५ लाख रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाघोली पोलिसांनी अटक करत मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. चोरीस गेलेल्या मालासह एकूण २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री ते २८ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान, वाघोली येथील गट क्रमांक १३६१ बी / २/४ जैन वेअरहाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा. लि., लोणगाव रोड येथे अज्ञात चोरट्यांनी गोडावून फोडून तांब्याच्या तारांचा व स्क्रॅपचा सुमारे २५ लाख रुपयांचा माल चोरी केला होता. याबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने सुमारे १७२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून पाहणी केली व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबईतील खालील तीन सराईत आरोपींना अटक केली –
१. राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२), रा. सैफी पार्क, मुंबई
२. विनोद श्रीपाल जैन (वय ४०), रा. आत्माराम बिल्डिंग, गिरगाव, मुंबई
३. सोहेल फिरोज शेख (वय २२), रा. रे रोड, मुंबई

पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून ६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे तांब्याचे तारा आणि गुन्ह्यात वापरलेला १८ लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण २४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कार्यवाहीत सहभागी अधिकारी व पोलीस कर्मचारी:
पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पो.अं. प्रदीप मोटे, प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, महादेव कुंभार, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, प्रितम वाघ, समीर भोरडे, मंगेश जाधव, अमोल गायकवाड यांनी अथक मेहनत घेतली.

 विशेष बाब:
गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा आणि चोरट्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचे उत्तम नियोजन करण्यात आले. या माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेऊन, मुंबईतून तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

 निष्कर्ष:
या कामगिरीने वाघोली पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्क आणि परिणामकारक तपास कौशल्य सिद्ध केले आहे. औद्योगिक भागात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर वचक बसवण्यास ही कारवाई उपयोगी ठरणार आहे.