पुणे: पुणे शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने एक मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एकूण १० दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून, सुमारे ५,६०,०००/- रुपयांच्या वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये दोन मुख्य आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
गस्त दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई
दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार अमित गद्रे व बाळु गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम चोरीच्या दुचाकींच्या विक्रीसाठी फिरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डाडया ऊर्फ रियाज शार्दुल्ला शेख (वय २१, रा. आमराई, पाषाण), अनिल लिंगया भंडारी (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
अटक आरोपींकडून १० दुचाकी हस्तगत, १० गुन्ह्यांचा खुलासा
सखोल चौकशीनंतर या आरोपींनी पुणे शहर आणि इतर परिसरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेली वाहने विक्रीसाठी ठिकठिकाणी हलवली जात होती. आरोपींकडून एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्या खालील पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत –
-
मुंढवा पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. १३/२०२५ व १५/२०२५
-
सांगवी पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. ४१/२०२५ व ५९/२०२५
-
हडपसर पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. २२६/२०२५
-
बंडगार्डन पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. २१४२/२०२४
-
कोथरुड पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. ५८/२०२५
-
बाणेर पोलीस स्टेशन – गुन्हा क्र. २०/२०२५
-
राजगड पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) – गुन्हा क्र. २६/२०२५
-
शिरगाव-परंदवडी पोलीस स्टेशन (पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) – गुन्हा क्र. २६/२०२५











