गुन्हेगारी
पुण्यात पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या सराइतांचा सोलापूरमध्ये पर्दाफाश
पुणे: हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत गंभीर घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, आरोपींनी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९, तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २०, हडपसर), आणि अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय २३) यांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात...
भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर हल्ला; ‘टीएमसी कार्यकर्त्यांनी खूनाचा कट रचला’ असा आरोप.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांगु पांडे यांनी म्हटले, "आज मी आमचे नेते अर्जुन सिंग यांच्या निवासस्थानाकडे जात होतो... आम्ही काही अंतरावर गेलो असताना भाटपारा पालिकेकडून एक जेटिंग मशीनने रस्ता अडवला. आमची गाडी थांबल्यावर, जवळपास ५०-६० लोकांनी आमच्या वाहनावर हल्ला केला. ७-८...
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपी गौरव आपुनेची झारखंडमध्ये फायरिंग प्रॅक्टिस, शस्त्रसाठ्यासाठी शोध सुरू.
मुंबई, पुणे: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी गौरव आपुने (२३) याला ६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील कर्वेनगर येथून अटक करण्यात आली होती, तर अन्य आरोपी आदित्य राजू गुलांकर (२२) आणि रफीक नियाज शेख (२२) यांना ७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. गौरव आपुने, रुपेश मोहोल आणि शोधात असलेला आरोपी शुभम लोंकार...
सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई, २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत सोनं–चांदी पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लूट करणारी परराज्यातील टोळी पकडली आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड व पॉलिशचे साहित्य असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दांडेकर...
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएला मोठं यश! इंडोनेशियातून परत येताना दोन अतिरेक्यांना मुंबई विमानतळावर अटक, देशविरोधी कटाचे मोठे धक्कादायक खुलासे
पुणे | पुण्यातील गाजलेल्या आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. २०२३ पासून फरार असलेल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दोन संशयितांना इंडोनेशियातून परत येताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या टर्मिनल-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. अटक केलेले संशयित कोण? अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं अब्दुल्ला फैज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान...
वाकडमधील फिनिक्स मॉलबाहेर हवेतील गोळीबार; सीसीटीव्हीत कैद, आरोपी अटकेत.
पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकडमधील फिनिक्स मॉलच्या बाहेर मंगळवारी (१६ सप्टेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने हवेतील गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फिनिक्स मॉल हा परिसरातील सर्वात मोठा आणि प्रमुख मॉल म्हणून ओळखला जातो, आणि येथे अनेक लोक खरेदीसाठी आणि मनोरंजनासाठी येत असतात. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी गोळीबार केल्यानंतर संबंधित आरोपी पळून गेला, मात्र हा सर्व...
पुणे पोलिसांची भव्य कारवाई! आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती रॅकेटचा पर्दाफाश – 36 जण ताब्यात, 21 शस्त्रे जप्त
संघटित गुन्हेगारीविरोधातील मोठा विजय मिळवत, पुणे पोलिसांच्या झोन-4 आणि क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती व तस्करी रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या धडक मोहिमेत 36 संशयितांना ताब्यात, तर 21 अवैध शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. शस्त्र तस्करीचा पहिला धागा – 21 शस्त्रांची जप्ती पोलिसांनी गेल्या 3...
लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणारा आरोपी २ तासांत जेरबंद, ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करत ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. दिनांक १२/०२/२०२६ रोजी फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे २,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोणी काळभोर...
पुण्यात ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश; उच्चभ्रू व्यक्तींना जाळ्यात ओढून खंडणी उकळणारे दोघे अटकेत
पुणे : कर्जाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि खंडणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून धमकी देणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणे तसेच प्रतिष्ठित उद्योजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे अशा गंभीर आरोपांखाली दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२४ मध्ये फिर्यादी...
पुण्यात बसमधील वयोवृद्ध महिलांच्या दागिन्यांची चोरी – भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई!
पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या वयोवृद्ध महिलांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याचा तपशील – बसमधील चोरीने वाढली भीती! दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता एका ६२ वर्षीय वृद्ध महिला हडपसरला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना, तीन अनोळखी इसमांनी...











