फुलवडे येथे श्री औदुंबरेश्वर देवस्थानचा अमृत महोत्सव भक्तिभावात साजरा; अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती
आंबेगाव | आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील श्री औदुंबरेश्वर देवस्थानच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. या पावन सोहळ्यात सहभागी होत काल्याच्या कीर्तनाचा भक्तिभावाने लाभ घेण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. श्रीपाद महाराज कुडेकर यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा मार्ग आणि समाजातील एकोप्याचा संदेश भाविकांना दिला....
काँग्रेस भवनाबाहेर भाजप–काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; पुणे पोलिसांकडून क्रॉस FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या घटनेनंतर पुणे शहर पोलीस यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात क्रॉस FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. आंदोलनानंतर तणाव वाढला ही घटना राज्य काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या राजकीय वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर घडली. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्ते काँग्रेस भवनाजवळ...
मतदानाचा उत्सव, माणुसकीचा हात; ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलिसांचा आदर्श उपक्रम
पुणे : लोकशाहीच्या महोत्सवात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. वय, आजारपण किंवा हालचालीतील अडचणी या कुठल्याही कारणामुळे कोणाचाही मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी माणुसकीचा आणि जबाबदारीचा आदर्श दाखवला आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना मदतीचा हात देत पुणे पोलिसांनी लोकशाहीचे खरे रक्षणकर्ते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काठीचा आधार घेऊन आलेले आजी-आजोबा, व्हीलचेअरवर...
मोठी कारवाई! पुणे गुन्हे शाखेने उध्वस्त केला बनावट RMD गुटखा कारखाना
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत बनावट RMD गुटखा व सुगंधीत तंबाखू तयार करणारा मोठा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ₹1,00,00,000/- किंमतीचा मुद्देमाल, तीन वाहने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा मानके अधिनियमासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापेमारीची...
मुंढवा पोलिसांचा कठोर दणका! हॉटेल लोकल बारमध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल, हॉटेल सील
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एबीसी रोडवरील हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या जबरदस्त हाणामारीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून, हॉटेल लोकल बार सील करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री उशिरा हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. मोबाईलने व्हिडीओ शूट करण्याच्या...
पुणे: नाना पेठेतील ऐतिहासिक वाड्याला पहाटे आग; आगीत मोठ्या नुकसानीची भीती, सुदैवाने जीवितहानी नाही!
पुणे शहरातील ऐतिहासिक आणि घनदाट वस्ती असलेल्या नाना पेठ परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका पारंपरिक लाकडी वाड्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना घडली तेव्हा परिसर शांत होता, परंतु काही क्षणांतच धुराचे लोट आणि ज्वाळा दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. आग लागलेला वाडा हा जुना, लाकडी रचनेचा असून त्यात अनेक कुटुंबं राहत होती. लाकडी संरचनेसाठी आग अत्यंत वेगाने पसरली....
“इन्स्टाग्रामवरून नायलॉन मांजा विक्रीचा प्रयत्न; पुणे पोलिसांची धडक कारवाई – दोघे अटकेत, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त”
पुणे : शहरात पुन्हा एकदा बंदी असलेल्या नायलॉन मांजा (Synthetic Kite String) विक्रीचे गुन्हे समोर आले असून, मुंधवा पोलीस ठाण्याच्या पथकाने इन्स्टाग्रामवरून मांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे आयुष राहुल शिंदे (20) आणि यशराज विजय दिवेकर (20) अशी आहेत. दोघेही हडपसर परिसरातील रहिवासी आहेत. गोपनीय माहिती मिळताच अचूक सापळा सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोमन यांच्या पथकाने...
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती...
शिवम आंदेकर याच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल; विजेची चोरी, निष्काळजीपणा आणि परवानगीशिवाय फलक लावल्याने झाला अपघात
पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नानापेठ येथे शिवम उदयकांत आंदेकर याने परवानगीशिवाय लावलेल्या लोखंडी फलकामुळे आणि त्यात बेकायदेशीररित्या वायरींग करून वीजपुरवठा घेतल्यामुळे घडलेली ८ वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूची घटना सध्या शहरात संतापाचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण करत आहे. फलकाच्या लोखंडी खांबाला विजेचा करंट उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? दिनांक १ जून २०२५ रोजी नानापेठमधील...
पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुण्यात आगमन!
पुणे – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या २७व्या बैठकीला हजेरी लावली. या महत्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली, दमण-दीव यांच्यातील विविध विकासकामे, सहकार धोरणे आणि प्रशासकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीत हे मुद्दे येणार चर्चेत 🔹 पश्चिम भारतातील सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणावर चर्चा🔹...









