पुणे

Home पुणे Page 8

फरार आरोपीस येरवडा पोलिसांची शिताफीने जेरबंदी — मोक्का अंतर्गत मोठी कारवाई!

0

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात फरार होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि गुप्त बातमीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हा क्रमांक १८३/२०२५ अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११८ (२), ३५१(३)(५), आर्म्स...

पुणे जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

0

पुणे – पुणे जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक श्री. प्रशांत खाडे (जुन्नर विभाग) व श्री. महादेव मोहिते (पुणे विभाग), प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील...

वानवडी पोलिसांची मोठी कामगिरी : न्यूड फोटो मॉर्फिंग प्रकरणी गुन्हेगाराला अटक

0

पुण्यातील वानवडी पोलिसांनी इन्स्टाग्रामवर मॉर्फिंग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 🔹 प्रकरणाचा तपशील: एका अनोळखी इसमाने पीडित महिलेचे फोटो आणि नाव वापरून इन्स्टाग्राम आयडी तयार केला. त्यानंतर या आयडीवरून महिलेकडे २,००० रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर...

हरवलेल्या माऊलीला दिला दिलासा! पोलिसांच्या सतर्कतेमुळे ५५ वर्षीय महिला सुखरूप पोहोचली दिंडीमालकांच्या ताब्यात

0

वारीतील गर्दीत हरवलेल्या एका वरिष्ठ महिलेला शोधून काढून सुखरूप तिच्या दिंडीमालकांकडे सोपवण्याचा माणुसकीचा आणि तत्परतेचा आदर्श पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. ठिकाण: मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्द, पुणे वारीचा उत्साह आणि भक्तिरस भरलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे शहरातून सुरू असताना, एक ५५ वर्षीय महिला – सीता दत्तात्रय ठाकूर, रा. दसखार, भटआळी – या वाऱ्याच्या वेगासारख्या चालणाऱ्या दिंडीत...

मोरवाडी कार्यालयात शहर पक्ष संघटनेच्या कामकाजाचा घेतला आढावा

0

पिंपरी-चिंचवड: "राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने ही भावना मनाशी पक्की बाळगली पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही," असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर प्रभारी अ‍ॅड. श्री भरतजी पाटील यांनी केले. मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहराच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते....

निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग उघड; येवलेवाडीमध्ये संशयित वाहनांतून रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त

0

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत आचारसंहितेच्या भंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस व भरारी पथकाच्या (FST) सतर्कतेमुळे संशयित दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता बधे स्टील, खडीमशीन चौक परिसरात...

पैशांच्या वादातून मित्राचाच खून; १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

0

पुणे : पैशांच्या लालसेपोटी मित्रालाच संपवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अवघ्या १२ तासांच्या आत खुनातील सर्व आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जलद कारवाईमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर असलेला पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गु.र.नं. २७/२०२६ भा.न्या.सं.क. १०३(१) या...

पुण्यात पुन्हा निर्घृण हत्या: पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर कुऱ्हाडीने हल्ला.

0

पुणे: हडपसर येथे काल मध्यरात्री झालेल्या एक धक्कादायक घटनेत वित्त व्यवस्थापक वासुदेव कुलकर्णी (वय 45) यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. विशेष म्हणजे, हा हल्ला फुरसुंगी-सासवड रोडवरील पोलीस स्टेशनपासून अवघ्या 300 मीटर अंतरावर रात्री 2:30 वाजता घडला, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल हॉटस्पॉटवरील किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांचा...

पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलमध्ये ‘DigiYatra’ सेवेचा भव्य शुभारंभ!

0

पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी नवीन डिजिटल युगाची सुरुवात होत आहे! अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेल्या नवीन टर्मिनलवर ‘DigiYatra’ सेवेचा शुभारंभ शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 🔴 पुणे विमानतळाच्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा! ‘DigiYatra’ सेवा सुरू झाल्याने पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्वरित...

पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम...

Copyright ©