पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला उत्साहात सुरुवात…
पिंपरी :- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय...’, ‘जय भवानी, जय शिवाजी....’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानाचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी प्रचंड...
खडक पोलीसांची धडक कारवाई; पठाण पान शॉपवर छापा, ₹४.८७ लाखांचा अवैध गुटखा जप्त
पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा साठवणुकीवर जोरदार कारवाई करत ₹४,८७,२०४/- किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या विशेष आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. घटनाक्रम: दि. २५ जून २०२५ रोजी खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम यांना...
जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन
नाशिक : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय...
पिंपरीत भाजपचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला “जोडे मारो आंदोलन”
पिंपरी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आणि त्यांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली. शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या...
दहीहंडी उत्सवात अंमली पदार्थ विरोधी जागृतीचा अनोखा उपक्रम!
पुणे : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना पुणे शहर पोलिसांनी एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला. हडपसर पोलिस स्टेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजात विशेषतः तरुणाईमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान...
टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार
मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित...
अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा..
पिंपरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या ग, ड आणि ह प्रभागातील तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अ, ब प्रभागातील महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांचा सखोल आढावा घेतला. शहरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी घाटांवर येतात. यंदाही या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने विशेष तयारी केली आहे....
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार
पिंपरी, दि. १६ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य संदीप कस्पटे,बाबासाहेब त्रिभुवन,नगरसदस्या आणि अधिकारी,कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात...
पुण्यात बनावट Puma उत्पादनांचा पर्दाफाश; ८.०२ लाख रुपयांच्या मालावर पोलिसांचा छापा.
सविस्तर बातमी: बनावट उत्पादनांचा भांडाफोड: पुणे पोलिसांनी अम्बेगाव बुद्रुक येथील निपाणी वस्तीत स्थित “स्टायलॉक्स फॅशन हब” या दुकानावर छापा टाकून बनावट Puma उत्पादनांचा साठा जप्त केला. ८.०२ लाख रुपयांचा माल जप्त: जप्त केलेल्या मालामध्ये Puma लोगो असलेले बॅग, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, स्लायडर्स, जॅकेट्स, ट्राउझर्स आणि बॉक्सर पँट्स यांचा समावेश आहे. कायदेशीर कारवाई: दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कॉपीराइट कायदा, १९५७...
शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर
पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...










