Home Breaking News अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांची पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेच्या रुग्णालयांची पाहणी
महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे अनुषंगाने दवाखाने व रुग्णालयातील अंतर्गत कार्यालयीन सुधारणा करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी विभागांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. रुग्णांना उत्तम सेवा आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.