पुणे महापालिकेत गोंधळ! माजी मनसे नगरसेवक किशोर शिंदे यांचा आयुक्त राम यांच्यावर संताप; “मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!”
पुणे, ६ ऑगस्ट २०२५ – पुणे महापालिकेत आज एका धक्कादायक प्रकारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात धडक दिली. चालू बैठकीतच आयुक्तांवर आरडाओरडा करत "मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!" अशी थेट धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. ही घटना आयुक्तांच्या कार्यालयात घडली, जेव्हा स्वच्छता मोहीम संदर्भात एक बैठक...
शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण: शिवरायांचे १२ दुर्ग युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट – भारताचे वैभव जागतिक स्तरावर चमकले!
पुणे | १२ जुलै २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचे ऐतिहासिक साक्षीदार ठरलेले १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. प्रत्येक शिवप्रेमींसाठी, मराठी मनासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर झालेले मान्यतेचे हे अनमोल यश आहे. कोणते आहेत हे गौरवशाली १२ किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड,...
ससून रुग्णालयातील भीषण स्थिती – व्हीलचेअर न मिळाल्यामुळे आजारी रुग्णाला उन्हात चालवत नेलं, सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
पुणे – एकीकडे सरकार आरोग्यसेवा सक्षम असल्याचे दावे करत असताना, दुसरीकडे राज्याच्या मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या ससून रुग्णालयातील वास्तव भयावह आहे. एका गंभीर रुग्णाला व्हीलचेअर मिळाली नाही, त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपर्यंत उन्हात चालवत आणावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "ससूनमध्ये सुविधा नव्हे, फक्त आश्वासन!" रुग्णालयात असंख्य रुग्ण...
भीमाशंकरच्या विकासाला गती! 288 कोटींच्या आराखड्यास मान्यता; कुंभमेळ्यापूर्वी दर्जेदार सोयीसुविधांचा विकास होणार
पुणे : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर पर्यावरणप्रेमी आणि भाविकांसाठीही एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यामध्ये 288.17 कोटी रुपये खर्चाच्या भव्य "श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास"...
हडपसर पोलिसांची कारवाई – देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूसासह संशयित अटक; गुन्हेगारी कारवायांना आळा!
पुणे, हडपसर:- हडपसर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करत संशयित चिराग संजय सर्जेराव (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, मांजरी) यास ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई परिसरातील नागरिकांमध्ये गुन्हेगारीविरोधातील विश्वास वाढवणारी ठरली आहे. कारवाईची पार्श्वभूमी : दि. २२ एप्रिल रोजी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस अंमलदार...
माजी आमदार, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे निधन; मावळने गमावला एक विचारवंत नेतृत्व
पुणे : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते, शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे (वय ८९) यांचे सोमवारी (दि. ३० जून) रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. द्रष्ट्या नेतृत्वाचा अंत – शिक्षणासाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्त्वकृष्णराव भेगडे हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श नाव होते. त्यांनी शिक्षण प्रसारासाठी झटत...
वारजे माळवाडीत दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांचा शिताफीने पकड! लोखंडी हत्यारांसह दोन आरोपी अटकेत
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ३ व वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने संयुक्तरित्या शिताफीने अटक केली आहे. दि. ८ जून २०२५ रोजी, बीट मार्शल पथक गस्त घालत असताना फिर्यादी इसमाने आहेरगाव गाव कमानीजवळ पोलिसांना थांबवून माहिती दिली की, त्याच्या मित्रांनी...
काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले. दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने...
“आदिवासी सक्षमीकरणासाठी ठोस निर्णयांची बैठक; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा”
पुणे | दिनांक: २८ जून २०२५ :- पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भूषवले. बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू – आदिवासी विकासाचा रोडमॅप या बैठकीत शिक्षण,...
महाराष्ट्राच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात भव्य ध्वजारोहण समारंभ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी पुणे शहरात अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध अशा ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर सकाळी ८ वाजता हा समारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या राष्ट्रभक्तिपूर्ण सोहळ्याला पुणे...










