मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कोका-कोला बेव्हरेजेससोबत सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (HCCB) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांचा उद्देश स्थानिक पातळीवर उद्योग व प्रशासन यांच्यातील सामंजस्य अधिक दृढ करणे, रोजगार संधी वाढवणे आणि सामाजिक तसेच पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणे असा आहे. या सामंजस्य करारांतर्गत पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे: पुणे जिल्हा प्रशासन + HCCB पालघर जिल्हा...
ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र अंतर्गत महिला कलाकारांनी सादर केली पुण्यातील मानाच्या गणपतीची आरती, उपस्थितांनी गायला ‘गणपती बप्पा मोरया’
पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे पुण्यातील मानाच्या गणपतीची महिला कलाकारांच्या हस्ते भव्य आरती सादर करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावून या आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात या कार्यक्रमाने वेगळीच भावनिकता निर्माण केली. या विशेष कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री पुष्पा चौधरी, अभिनेता चेतन चावडा, अभिनेत्री...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चंद्रकांत दादा पाटील यांची लांडगे कुटुंबाच्या भेटी
गणपती बप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..! राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच संसदीय कामांचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लांडगे कुटुंबाच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी लांडगे कुटुंबात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि कुटुंबियांचे अभिवादन स्वीकारले. या विशेष भेटीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, विधान परिषदेचे आमदार माननीय उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे,...
मराठा समाजासाठी ऐतिहासिक विजय! महायुती सरकारचा आरक्षणविषयक निर्णय लागू, ग्रामपातळीवर कुणबी प्रमाणपत्रासाठी मार्ग मोकळा
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दशकांपासून चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. आज महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या असून, हा दिवस मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाने सातत्याने आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मागे सामाजिक न्याय, आर्थिक उन्नती आणि समान संधी सुनिश्चित करण्याची महत्त्वाची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
सहकारनगर पोलिसांची धडक कारवाई : गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक
पुणे – सहकारनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे. घटनेचा तपशील असा की, 2 जुलै 2025 रोजी एका नागरिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी धारदार शस्त्र वापरून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात...
सहकारनगर पोलिसांची मोठी धडक कारवाई : १० किलोहून अधिक गांजा जप्त, सराईत आरोपी अटकेत
२९ ऑगस्ट २०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीस पोलिसांनी शिताफीने पकडले. या कारवाईत तब्बल १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ₹३ लाख इतकी आहे. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा धडाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक सातारा...
महिलेचा वेष धारण करून कंपनीत चोरी करणारे दोन शिताफीबाज गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात
पुणे पोलिसांनी अत्यंत चलाखीने चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने महिलेचा वेष, गाऊन, सलवार-कमीज तसेच मास्क व ओढणी घालून कंपनीत चोरी केली होती. मात्र वानवडी पोलिसांच्या तपासपथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज, चपलेचा मागोवा आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना गाठले आणि मोठी कामगिरी बजावली. घटनेचा तपशील दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:43...
मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी
राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून 'सारथी' ही संस्था सुरू केली आहे. मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती' या बोधवाक्याखाली...








