पुणे पोलिसांचा बॉम्ब शोध पथकातील हिरो ‘तेजा’ सेवानिवृत्त; १० वर्षांच्या उत्कृष्ट सेवेसाठी विशेष सन्मान.
पुणे: पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोध व नाश पथकातील (BDDS) महत्त्वाचा सदस्य स्निफर डॉग तेजा आपल्या १० वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर सेवानिवृत्त झाला आहे. शिवाजीनगर येथील BDDS कार्यालयात तेजा याच्या सन्मानार्थ एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात तेजा याच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला व त्याला सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रारंभ व प्रशिक्षण: तेजा याचा जन्म ११ जानेवारी २०१५...
मतदान जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन
पिंपरी : लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे, १५ जानेवारी रोजी राज्य शासनाने निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सर्वप्रथम शहरातील सर्व मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, आपले मतदान ही आपली जबाबदारी असून आपल्या कर्तव्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी केले. पिंपरी चिंचवड...
भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर हल्ला; ‘टीएमसी कार्यकर्त्यांनी खूनाचा कट रचला’ असा आरोप.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांगु पांडे यांनी म्हटले, "आज मी आमचे नेते अर्जुन सिंग यांच्या निवासस्थानाकडे जात होतो... आम्ही काही अंतरावर गेलो असताना भाटपारा पालिकेकडून एक जेटिंग मशीनने रस्ता अडवला. आमची गाडी थांबल्यावर, जवळपास ५०-६० लोकांनी आमच्या वाहनावर हल्ला केला. ७-८...
औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, कोयते, वाहनांसह ७.६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : औंध येथील विधाते वस्तीमध्ये २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीवर चतुःश्रृंगी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १५ जणांच्या टोळीने हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्रं घेऊन परिसरात...
सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा धडक अॅक्शन! चार जणांना अटक, १३ इंस्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल
पुणे शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली. 📌 गुन्हेगारीच्या महिमा मंडनाविरोधात कठोर पावले! गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या....
जागतिक थेट प्रक्षेपणातून जिल्ह्याचे वैभव अधोरेखित; क्रीडा, संस्कृती, इतिहास व आधुनिकतेचा संगम जगासमोर
पुणे : ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आज अंतिम टप्पा पूर्ण होताच ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. उत्कृष्ट नियोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही स्पर्धा देश-विदेशातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारत व भारतीय उपखंडात ‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर, तर युरोपसह जगातील ७० हून अधिक...
राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या – गृह विभागाचा मोठा निर्णय, सुरक्षा व्यवस्थेत नवीन घडी!
मुंबई | प्रतिनिधी: महाराष्ट्र गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत राज्यातील पोलिस यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, नवीन अधिकाऱ्यांवर अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्यांची झलक: रायगड जिल्ह्यात आंचल दलाल यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्या पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या पत्नी आहेत. पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख यांनी...
२० वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येणं! ‘व्हिक्टरी रॅली’मध्ये उद्धव-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, मराठीच्या मुद्यावर ठोस भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर वरळीतील एनएससीआय डोम येथे एकत्र येणार आहेत. ही 'व्हिक्टरी रॅली' मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यात मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणारी आहे. मागील भेट आणि दूरावलेली वाट:याआधी दोघे बंधू...
उष्णतेची तीव्र लाट पुणे आणि विदर्भावर धडकली! नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे/विदर्भ, २२ एप्रिल २०२५: पुणे आणि विदर्भातील नागरिकांना यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दररोज तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जात असल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह पुणे शहरात सुद्धा तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस "हीटवेव्ह अलर्ट" जारी केला असून, नागरिकांना...
लग्नाच्या आमिषाने ८५ वर्षीय पुणेकरास ११.४५ लाखांना गंडवले! ऑनलाईन विवाहजाळ्यात फसवणूक
पुणे | २१ जून २०२५ :- पुण्यातील ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्या एकटेपणावर उतारा म्हणून जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र याच प्रयत्नात त्यांना ११ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक सहन करावी लागली. ऑनलाईन सायबर गुन्हेगारांनी विवाहाच्या आमिषाने त्यांची आर्थिक लूट केली आहे. वृध्दाचा विवाहासाठी संपर्क... आणि सुरुवात झाली फसवणुकीची 🔸 बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या या वृद्ध व्यक्तीने एका वृत्तपत्रातील विवाह जाहिरातीवरून...










